Uncategorized
विज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे नागरीक हैराण
शिरूर ama9 न्युज
शिरूर शहरातील विज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारा मुळे नागरिक प्रचंड हैरान झाले असुन ,हम करोसे कायदा या प्रमाणे येथे मनमानी चालु असुन यावर अंकुश ठेवायला ना लोकप्रतिनिधी ,ना वरिष्ठ अधिकारी कुणीही पुढे येत नसल्याने नागरिकांनी दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न पडला आहे .
शिरूर येथील विज वितरण कंपनीचे कार्यालय
आहे . त्या ठिकाणी ग्राहकांनचे प्रश्न सोडविले गेले पाहिजे मात्र अक्षरशः या ठिकाणी नागरिकांना मानासिक त्रास दिला जातो . शहरात वेळो वेळी विज जाणे हे तर रोजचाच खेळ झाला आहे . विजे संदर्भात तक्रारार करायला विज वितरण कंपनीचा नंबर बंद आहे . मागील काही दिवसापासून विजेचा लपंडाव चालु असुन विज वितरण कंपनीच्या मनाला वाटेल तेव्हा विज जाते , गुरवारी कामासाठी दिवसभर विज बंद करुन सुध्दा आठवडाभर विज जाणे चालुच असुन या विज जाण्या येण्या मुळे अनेक घरातील घरगुती उपकरणे जळुन गेली आहे . याला जबाबदार कोण . विज बिल कमी करणे ,रीडिंग चुकीचे आले ,मीटर जळणे व तो बदलणे ,नवीन मीटर घेणे ,डि पी वरचा फ्युज जाणे ,विज बिल न येणे ,बिला मध्ये रीडिंग न येणे या सारखे अनेक प्रश्न शेकडो नागरिक कार्यालयात येत असतात मात्र त्यांनचे प्रश्न सुटण्या पेक्षा त्यांना उडवाउडवीची व अरेरावीची भाषा मिळ्ते अनेक ग्राहकांना हेलपाटे मारायला लावणे,तोंड बघुन काम करणे ,मोठ्या लोकांचे विज बिल कमी करणे त्यांना फायदा होइल असे काम करणे ,गोर गरीब नागरिकांचे विज कनेक्शन बिल अभावी कट करणे मात्र मोठ्या लोकांकडे हजारो रुपये बिल बाकी असताना त्यांच्यावर कुठलीही कारवाई न करणे अशा अनेक घटना घडत असुन या नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने नेमुण दिलेली शासकीय कमीटी सुध्दा नावाला असुन ते त्यांचे स्वतःचे पहात आहे . हि कमीटी फक्त बोर्डावरच दिसत आहे .
काही नागरीकानवर मीटर देता का मीटर अशी म्हणण्याची वेळ आली असुन अनेक महिन्यापासून हेलपाटे मारुन वैतागलेल्या नागरीकांना कोणीच वाली नसल्याने काही आर्थिक कारणासाठी काम आडवले जात असल्याची शंका नागरीकांनी व्यक्त केली आहे .
विज वितरण कंपनीचे मागील अधिकारी हे अकरा वर्ष शिरूर शहरात कार्यरत होते मात्र कधीही एक तासा पेक्षा विज गेली नाही मात्र ते राजकारणाचा बळी ठरुन त्यांची बदली करण्यात आली . ज्यांनी बदली केली ते आज काहीच बोलत नाही . नागरीकांनचे होणारे हाल हे थांबणार आहेत कि नाही का हुकुमशहा प्रमाणे कारभार चालणार या बाबत नागरिकांचे लक्ष लागले आहे .



