वाढदिवसानिमित्त सामाजिक भान; ‘आपले घर’ प्रकल्पासाठी २१ हजारांची मदत

शिरूर प्रतिनिधी
“शिवाजीराव आढळराव यांच्या माध्यमातून शिरूर लोकसभा मतदारसंघात विविध विकासकामांना गती मिळाली आहे. शिरूर शहराची पाणीपुरवठा योजना असो किंवा इतर विकासकामे, त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून ती मार्गी लावली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यंदा निराधारांसाठी उभ्या राहत असलेल्या प्रकल्पाला मदत करण्याचा निर्णय घेतला.”
असल्याचे मत शिरूर नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती अंजली मयूर थोरात यांनी व्यक्त केले
वाढदिवस म्हटला की फ्लेक्स, बॅनर आणि जाहिरातींचा गाजावाजा दिसून येतो. मात्र, म्हाडाचे सभापती तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूरमध्ये सामाजिक बांधिलकीचा वेगळाच आदर्श पाहायला मिळाला. शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात व माजी नगरसेविका अंजली मयूर थोरात यांनी फ्लेक्स व अन्य खर्चाला फाटा देत वात्सल्य सिंधू फाउंडेशनच्या ‘आपले घर’ या निराधारांसाठी उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पासाठी २१ हजार रुपयांची मदत दिली.
या मदतीचा धनादेश संस्थेच्या उषा वाखारे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. गोलेगाव येथे निराधारांसाठी उभारण्यात येणारा ‘आपले घर’ हा प्रकल्प अनेक गरजूंना आधार देणारा ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
“आढळराव हे सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सतत धावून जाणारे आणि कार्यकर्त्यांना बळ देणारे नेतृत्व आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
उषा वाखारे यांनी वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून सामाजिक कार्यासाठी मदतीचा हात पुढे केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “निराधारांसाठी उभारल्या जाणाऱ्या ‘आपले घर’ प्रकल्पाला समाजातील दानशूर व्यक्तींनी सहकार्य करावे,” असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार माजी नगरसेविका अंजली थोरात यांनी मानले.



