शिरूर तालुकासामाजिक

मारुती आळी व सरदार पेठ येथील वीज पुरवठा सुरळीत करा नागरिकांची मागणी

शिरूर प्रतिनिधी

मारुती आळी व सरदार पेठ येथे होणारा विद्युत पुरवठा कमी व्होल्टेज होत असल्याने अनेक घरातील उपकरणे खराब झाले असून त्वरित या ठिकाणचा विद्युत उपकरणे सुरळीत करावा अशी मागणी सरदार पेठ व मारूती आळी मधील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे केली आहे
यावेळी उपनगराध्यक्ष मितेश गादिया,नगरसेवक राजेंद्र लोळगे,डॉ संतोष पोटे व मारुती आळी व सरदार पेठ मधील व्यापारी वर्ग सह नागरिक उपस्थित होते संदर्भातील निवेदन शिरूर येथील वीज वितरण कंपनीच्या शाखा अभियंता यांना देण्यात आले आहे

 

 

या निवेदनात म्हटले आहे कि
आम्ही सर्व रहीवाशांच्या वतीने तक्रार अर्ज लिहीत आहोत, गेल्या सहा महीन्यापासुन बाजार पेठेत अनियमीत ३ फेजचा कमी व्होल्टेजचा विज पुरवाठा होत आहे त्यामुळे जास्त व्होल्टेजचे उपकरण बंद होत आहेत उदा. त्या भागातील हॉस्पिटल लिफ्ट, व्यावसायिक लिफ्ट, ३ फेज वरती चालणारी मोटार व बाजारपेठेतील उपकरणे बंद होत असून वारंवार समस्या येत आहे,  या ठिकाणी 200  च्या जागी 400 चा टान्सफॉर्मर बसवण्यात यावा ही विनंती  केली

आपल्याकडे वारंवार सुचना व तक्रार देऊन व्यापारी वर्गाना आज पण कमी व्होल्टेजच्या पुरवल्यामुळे गैरसोय होत आहे तरी आपण कृपा करून स्थळ पाहणी करून समस्यांची गंभीरता लक्ष्यात घेऊन बाजारपेठेतील अडचण दूर करावी अशी मागणी या निवेदनात केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button