शिरूर चा हा नगरसेवक विधानपरिषदेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक❓

शिरूर प्रतिनिधी
जून मध्ये होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिरूर नगरपरिषदेचे नगरसेवक अभिजीत गणेश पाचर्णे ही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा असून प्रत्यक्षात येत्या काही दिवसात हे चित्र स्पष्ट होणार आहे.
जूनमध्ये होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पुणे विभागातून जिल्ह्यातील नगरपरिषदेचे नगरसेवक हे मतदान करणार असून या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच असून दोन्ही पक्षाचे नगरसेवकांची संख्या जवळपास मागेपुढे असून त्यामुळे ज्या पक्षाला महायुतीमध्ये ही जागा जाईल त्या पक्षाचा आमदार या ठिकाणी निश्चित मानला जात आहे त्यामुळे या ठिकाणी अनेक जण इच्छुक असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिरूर चे नगरसेवक अभिजीत गणेश पाचर्णे यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असून ती या निवडणूक निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे चर्चा शिरूर नगर परिषदेच्या प्रांगणात सुरू आहे .

सन 2016 मध्ये अभिजीत पाचर्णे हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते तर सध्या ते स्वीकृत नगरसेवक म्हणून शिरूर नगर परिषदेमध्ये कार्यरत आहे.



