शिरूर तालुकासामाजिक

स्थानिक नगरसेवक संतोष थेऊरकर यांच्या पाठपुराव्यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात

शिरूर प्रतिनिधी

शिरूर शहरातून जाणारा पुणे नगर रस्त्यावर जोशी वाडी ते तहसील कार्यालय रोडवर गेल्या अनेक वर्षापासून पडलेले खड्डे व त्यात अनेक नागरिकांचे झालेले अपघात यामुळे त्रस्त झालेले नागरिक यावर स्थानिक नगरसेवक भाजप नगरसेवक संतोष थेऊरकर यांनी पुढाकार घेऊन हे खड्डे बुजवण्यात त्यांना यश आले असून संतोष थेऊरकर यांच्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणचे अनेक वर्षाचे खड्डे हे भोजले गेलेले आहे

 

 

याबाबत माहिती पुढील प्रमाणे
जोशीवाडी परिसरातील पुणे-नगर रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर व त्रास सहन करावा लागत होता. वाहनचालकांसह पादचारी नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने परिसरात अपघातांची भीतीही निर्माण झाली होती. त्या काही वर्षांपासून या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या ठिकाणी अनेक अपघात झाले व दुचाकी स्वार या ठिकाणी या खड्ड्यात पडून अनेक जण जखमी झाली आहे या रस्त्याची दुरुस्ती होणे गरजेचे होते स्थानिक नगरसेवक संतोष थेऊरकर यांच्या पुढाकाराने हा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांनी सुटकेचा विश्वास सोडला आहे

 

यासंदर्भात नगरसेवक संतोष थेऊरकर म्हणाले की गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर  खड्डे पडल्याने वाहनधारकांना कसरत करत प्रवास करावा लागत होता. विशेषतः रात्रीच्या वेळी या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.नागरिकांकडून वारंवार मागणी होत होती..दरम्यान नगरसेवक संतोष थेऊरकर यांनी या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे, सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती सुनील जाधव तसेच स्थानिक नगरसेविका सुनीता भुजबळ नगरपरिषदेचे बांधकाम विभागाच्या प्रमुख समाधान मुंगसे मार्गदर्शनाखाली प्रलंबित असलेले रस्त्याचे काम मार्गी लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button