शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक 16 रोजी रांजणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
शिरूर प्रतिनिधी
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी रांजणगाव येथील राजमुद्रा चौकात ग्रँड विस्टा या हॉटेलमध्ये मंगळवार दिनांक १६ जून रोजी सकाळी दहा वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील व शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवी बापू काळे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व शिरूर हवेली चे आमदार माऊली कटके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये ही बैठक होणार आहे.
याबाबत शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी सांगितले की शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत आहे नऊ वर्षानंतर होत असलेल्या या निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक असून 18 जागेसाठी होत असलेल्या या बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पाडणार आहेत त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांनी रांजणगाव येथे येऊन आपल्या मुलाखती द्याव्यात
बाजार समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे इच्छुकांची संख्या खूप असल्याने इच्छुक उमेदवारांमधून कोणाला उमेदवारी मिळते याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागले आहे



