शिरूर तालुकासामाजिक

शिरूर शहरातील अतिक्रमणाची कारवाई योग्य की अयोग्य,प्रमुख लोकांच्या प्रतिक्रिया

शिरूर प्रतिनिधी

शिरूर शहरात व शिरूर शहरातील उपनगरात दिनांक 25 26 रोजी झालेल्या अतिक्रमणावर कारवाईचे सर्वत्र स्वागत होत असून या ऐतिहासिक कारवाईचे अनेकांनी समर्थन केले असून तर काहींनी याला विरोध केला आहे मात्र शिरूर शहरात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात अडथळा ठरणाऱ्या रस्त्यावरील बोर्ड व सिमेंटचे कट्टे तसेच शेड यावर कारवाई झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केला आहे फक्त यावर पुन्हा अतिक्रमण होऊ नये अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे
शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन दिवस चाललेल्या कारवाईत नगर रचनाकार पंकज काकड प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ व बांधकाम विभागाचे समाधान मुंगसे यांनी मोलाची भूमिका बजावली मात्र हे जे अतिक्रमण काढण्यात आले आहे त्यावर अतिक्रमण तसेच या अतिक्रमणामध्ये जे विस्थापित झाले आहेत त्यांचे पुनर्वसन किंवा त्यांना व्यवसायासाठी एक चांगली जागा देण्याची जबाबदारी शिरूर नगर परिषदेने आगामी काळात पार पाडावी अशी अपेक्षाही या व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे

याबाबत शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांनी सांगितले की ही दोन दिवस चाललेली कारवाई प्रशासकीय कारवाई होती यात ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहेत त्याबरोबर आम्ही आहोत भविष्यात त्यांना कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगत यांनी सांगितले

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संजय देशमुख यांनी सांगितले की ही अतिक्रमण झालेली कारवाई गोरगरिबात विरोध असून सध्याच्या महागाईच्या काळात परिस्थिती अत्यंत कठीण असताना ही कारवाई होणे गरजेचे नव्हते व्यवसाय हे पूर्ण मोकळीस आले असून त्यात जर अशी कारवाई झाल्यास हात गाडी पथारी वाले हे कुठे जाणार

याबाबत मुजफ्फर कुरेशी शिरूर शहर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष यांनी सांगितले की
या अतिक्रमणामध्ये हातगाडी यांच्या कारवाई झाली त्यांचा पुनर्वसन कसं करणार तसेच ज्या बिल्डिंगच्या पायऱ्यांवर नगरपरिषदेने कारवाई केली आहे त्या बिल्डिंगला नगरपरिषदेने पूर्णत्वाचा दाखला दिला असून आगामी काळात नगरपरिषदेने पार्किंग असल्याशिवाय बांधकाम परवानगी देऊ नये असे कुरेशी यांनी सांगितले

 

बाबत भूमिपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी सांगितले की शिरूर नगरपरिषदेमध्ये सन २०२१ ते २०२५ असे तब्बल ५ वर्ष प्रशासक होते,हे मदमस्तवाल मुख्याधिकारी येऊन ३ वर्ष झाले..मग ३ वर्ष खुर्चीवर होतात तेव्हा अतिक्रमण कारवाई का केली नाही ?

त्यावेळी अनेक धनदांडग्याचे मोठ मोठे बांधकामे सर्रास सुरू असताना डोळेझाक का केली ? त्यांचाकडून बेफाम पैसे उकळले आणि आता प्रमोशन अडकले म्हणून काहीतरी करण्याचा केविलवाणा प्रयत्न हे महाशय करत असल्याचे कुटे यांनी सांगितले.

 

याबाबत प्रवासी संघटनेचे अनिल बांडे यांनी सांगितले की अतिक्रमणाविरुद्ध केलेली कारवाई योग्य असून शिरूर शहर बकालीकरणाकडे सुरू होते त्यांच्यावर कोणाला अंकुश राहिला नव्हता अतिक्रमण काढणे गरजेचे होते शहराच्या रक्तवाहिन्या या रस्ते असतात ते मोकळे होणे गरजेचे होते त्यामुळे पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची काळजी शिरूर नगरपरिषदेने घेतली पाहिजे असेही बांडे म्हणाले

शिवसेनेचे शहर प्रमुख मयूर थोरात यांनी सांगितले की ही अतिक्रमणावर झालेली कारवाई ही योग्य असून गेल्या चार वर्षात प्रशासकीय राजवटी प्रशासन चांगले काम करत असून गेल्या दोन वर्षापासून मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी योग्य निर्णय व चांगले काम केले असून शिरूर शहराच्या बकालीकरणाला या गोष्टीमुळे एक ब्रेक लागला आहे त्यामुळे या कारवाई चे आम्ही स्वागत करून प्रीतम पाटील यांचे अभिनंदन करत आहोत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button