शिरूर तालुकासामाजिक

शहरात विजेचा लपंडाव नागरिक, व्यापारी त्रस्त त्

शिरूर प्रतिनिधी

 

शहरात गेल्या काही दिवसापासून विजेच्या लपंडाव मुळे नागरिक सह व्यापारी हैराण झाल्या असून या विजेच्या लपंडावामुळे प्रचंड कडक उन्हाळ्यात उकाड्या मुळे नागरिकांच्या हाल होत असून तसेच व्यापाऱ्यांना सुद्धा व्यवसाय फटका बसल्याने प्रचंड नाराजी नागरिक व व्यापारात असून मात्र कुठल्याही लोकप्रतिनिधी याकडे लक्ष न दिल्याने याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे

 

शहर व उपनगरात गेल्या काही दिवसापासून वेळी वेळी वीज जाणे हे नित्याचे झाले आहे कुठलेही कारण नसताना दिवसभरातून सहा ते सात वेळा वीज जाणे विजेचे कमी जास्त दाबात दिवसभर अनेक वेळा होणे याचा परिणाम अनेक विद्युत उपकरणावर होत असून अनेक विद्युत उपकरणे यामुळे खराब झाली आहे याबाबत याची भरपाई कोण देणार असा प्रश्न नागरिकांनी विचारलेला आहे आणि दिवस झाले अवकाळी पावसात थोडा वारा सुटल्याने तीन तीन तास चार चार तास लाईट जाणे यामुळे गेल्या अनेक दिवसापासून वीज जाण्यामुळे वीज व वर अवलंबून असणारे व्यवसाय झेरॉक्स चे दुकाने इस्त्रीय दुकाने केसकर्तनालय तसेच थंड पेयाची दुकाने हॉटेल्स यावर प्रचंड मोठा परिणाम झाला असून व्यवसायाच्या या दुकानांवर दिवसभरात वीज नसल्याने धंदा कमी झाला असून महिन्याचे भाडे कसे भरायचे असा प्रश्न व्यापाऱ्यांनी विचारलेला आहे

 

महाराष्ट्र राज्य विज वितरण कडून कुठली जबाबदार व्यक्ती याबाबत भाष्य करण्यास तयार नाही लाईट का जाते कशामुळे जाते काय कारण आहे हे सांगण्यास कोणी पुढे नसून नागरिकांना वाऱ्यावर सोडून दिल्याचे शिरूर शहरात सध्या दिसत असून जबाबदारी घेण्यास वीज वितरण कंपनी तयार नसून नागरिकांना प्रचंड कडक उन्हाळ्यात उकाडा सहन करावी लागत असून अनेक घरात वयस्कर आजारी व्यक्ती तसेच लहान मुले असून याचा कुठलाही विचार वीज वितरण कंपनी सध्या करताना दिसत नाही

आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके तसेच शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी याकडे लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांनी केली असून दोन्ही लोकप्रतिनिधींनी याबाबत शिरूर शहरात भेट देऊन शिरूर शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्या वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्याला कडक सुचना द्याव्या अशी मागणी अनेक नागरिकांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button