सत्ताधारी पक्षाचा गेम कोण करत आहे, कोंडीत पकडण्यासाठी सत्ताधारी पक्षाला कोण अडचणीत आणत आहे

शिरूर प्रतिनिधी
शिरूर शहराच्या राजकारणात शिरूर नगरपरिषदेमधील सत्ताधारी पक्षाचा गेम कोण करत आहे त्यांना कोंडीत पकडण्याचे षडयंत्र कोण करत आहे याच्यामागे कोण मास्टर माइंड कोण आहे यासारखे चर्चा शिरूर शहरात सुरू असून शिरूर नगर परिषदेमध्ये सुद्धा दबक्या आवाजात यावर चर्चा होत आहे.
नगरपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्यानंतर अनेक समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस समितीवर अध्यक्ष झाले मात्र दोन महिन्यातच या दोघांमध्ये सवता सुभा झाल्याने शिरूर शहराच्या राजकारणात एक वेगळीच कलाटली मिळती काय असे चित्र मध्यतरी झाले होते. पक्षातील सदस्यांमध्ये सध्या कमालीचे ताणतणाव असून यामागे नेमकं कोण आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे सत्ताधारी गटाकडून याबाबत सध्या सावध भूमिका घेत असली तरी या सत्ताधारी पक्षाचा गेम करण्यासाठी याच्यामागे कोण आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे.
या वातावरणाला राजकीय वळण देण्या मागे यामागे काही ठेकेदार असल्याचे राजकीय जाणकारांनी बोलताना सांगितले गेल्या अनेक वर्षापासून शिरूर नगर परिषदेवर हे दबा धरून बसलेले हे ठेकेदार यांनाच गुळाच्या ढेपेला चिकटलेल्या मुंगळ्यासारखे हे ठेकेदार यांना सर्व ठेके पाहिजेत यासाठी हे आग्रही असून सत्ताधारी गटाकडून मात्र याला विरोध होत असल्याने हे ठेकेदारांनी ही चाल खेळल्याचे बोलले जात आहे. काही ठेकेदारांनी काही नगरसेवकांना निवडून येण्यासाठी मदत केली होती त्यामुळे ठेकेदारांना वाटते की सर्व कामे आम्हालाच मिळाली पाहिजे त्यासाठी हे आग्रही असून त्यासाठी ते या नगरसेवकाने दबाव टाकत आहे व सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणण्याचं काम काही स्वयंघोषित ठेकेदार करत असले की चर्चा शिरूर नगरपरिषदेच्या आवारात दबक्या आवाजात सुरू आहे.
शिरूर नगरपरिषदेच्या या राजकारणात आत्तापर्यंत असे कधी घडले नव्हते की राजकारणात ठेकेदाराचा वाढता प्रवाह हा शिरूर नगरपरिषद नगर परिषदेच्या राजकारणाला मारक असून भविष्यात यांचा वाढणारा हस्तक्षेप हा राजकीय दृष्ट्या एखाद्याला अडचणीत आणू शकतो असे सध्या राजकीय वातावरण शिरूर शहरात असून या शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीला फक्त दोन महिने झाले असून पूर्ण पाच वर्ष अजून कार्यकाल पूर्ण करायचा आहे
याबाबत शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांनी सांगितले की शिरूर शहराच्या विकासाबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नसून शिरूर नगरपरिषदेमध्ये कुठलेही चुकीचे काम होऊ देणार नाही व कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही शिरूर शहराच्या विकासाबाबत आम्ही कटिबद्ध असून शिरूर शहराचा विकास हेच आमचे ध्येय उद्दिष्ट असल्याचे पाचर्णे यांनी सांगितले
मात्र या अशा राजकारणामुळे विकास कामे रखडले जाणार असून शिरूर नगर परिषदेमध्ये मिळणारी कामे ही सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे की नाही का काही ठेकेदारांनी जसे काही नगरपालिका आपल्याच नावावर केली आहे असे वागत असून त्या अनेक वर्षापासून या ठेकेदारांना लाखो रुपयांची बिले नगरपरिषदेने अदा केली आहे या बिलापोटी किती कामे झाली आहे त्याचा त्या कामे झालेल्या मेंटेनन्स या ठेकेदाराने पाळला आहे का नाही हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे का फक्त आपल्या जवळचे आहे म्हणून काम देणे आणि लाखो रुपये कराच्या रूपात येणाऱ्या नागरिकांचे पैसे हे ठेकेदाराच्या बिलावर उधळणे एवढेच काम नगर परिषदेचे नसून त्या करापोटी पैशाच्या बदल्यात विकास कामे होतात की नाही हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे



