दादा तुम्ही आज पाहिजे होते, शिरूर मधील नागरिकांची मनापासून हाक
शिरूर प्रतिनिधी
आज दादा पाहिजे होते दादा असते तर शिरूर तालुक्यातील कायदा सुव्यवस्था चा बोजबारा उडाला नसता शिरूर शहरात गेल्या सहा महिन्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला आहे त्या पार्श्वभूमीवर काही व्यापारी व काही ज्येष्ठ नागरिकांनी आपले मत व्यक्त केले.
शिरूर शहर हे शांतता प्रिय गाव म्हणून ओळखले जाते शिरूर शहरात शिरूर तालुका पारनेर व श्रीगोंदा येथील तालुक्याची बाजारपेठ असून शिरूर शहरात हजारो नागरिक दैनंदिन कामासाठी येत असतात मात्र गेल्या काही महिन्यात शिरूर शहरात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर झाली असून गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या असून त्यात तीन व्यक्तींचा मृत्यू झाला त्यामुळे व्यापारी व काही व नागरिक हे भयभीत झाले असून शिरूर शहराच्या अवस्था पूर्वी अशी नव्हती मात्र आता पूर्ण परिस्थिती आता बाहेर गेल्याचे नागरिकांनी मत व्यक्त करताना आत्ता दादा पाहिजे होती सगळे गुन्हेगारांना व पोलिसांना दादांनी वठणीवर आणले असते गुन्हेगारांचा कर्दनकाळ व प्रशासनावर पोलीस खात्यावर पकड ठेवणारे नेते म्हणून अजित दादा पवार यांची संपूर्ण राज्यात ओळख होती पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी पूर्ण जिल्ह्यावर गुन्हेगारांच्या बाबतीत कायदा सु व्यवस्थेच्या बाबतीत बाबतीत एक दरारा निर्माण केला होता कुठल्याही गुन्हेगारांची गैर केली जाणार नाही तसेच कुठल्याही गुन्हेगारांना या जिल्ह्यात थारा नाही असा स्पष्ट आदेश ते पोलिसाला देत गुन्हेगारी ही आवाक्यात आली पाहिजे असा स्पष्ट आदेश अजित दादांचा असायचा मात्र अजित दादा गेल्यामुळे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका हा पोरका झाला असून त्या पद्धतीने गुन्हेगारांनी डोके वर काढले असून त्या पद्धतीने त्यावर अंकुश ठेवण्यात राजकीय तसेच यंत्रणेला प्रशासकीय यंत्रणा अपयश आले आहे.
2000 नंतर 2001 नंतर शिरूर तालुक्यात रांजणगाव एमआयडीसी आल्यानंतर कारेगाव रांजणगाव तसेच शिरूर शहरात काही प्रमाणात त्यावेळेस भांडणाचे प्रमाण वाढले होते एमआयडीसीमध्ये कंपनीमध्ये ठेका घेण्यासाठी स्पर्धा लागली होती व या स्पर्धेतून स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी अनेक भांडणे त्यावेळेस झाली आजचे नेते व त्या वेळचे या भांडणात सामील असलेले अनेक जण त्यावेळचे तत्कालीन गृहमंत्री स्वर्गीय आर आर आबा पाटील हे सुद्धा कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत अत्यंत कडक होते त्यांनी तत्कालीन ग्रामीण अधीक्षक यांना सर्वांवर कारवाई झाली पाहिजे असे सांगत शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी मधली गुन्हेगारी ही संपुष्टात आली पाहिजे यासाठी मोठे पाऊल उचलले त्यावेळेस सुद्धा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा होते.
अनेक वर्ष पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा असल्याने गृहमंत्री कोणी असले तरी पुणे जिल्ह्यावर अजित दादा नियंत्रण असायचं तुला शिरूर तालुका हा अजित दादांचा आवडता तालुका असल्याने त्यांचे विशेष लक्ष या तालुक्या वाचायचं या ठिकाणी कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे अशी भूमिका अजितदादांची असायची मात्र आज अजितदादा जाऊन दहा महिने झाले दहा महिन्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढेपळले असून या कायद्यास व्यवस्थेला आज कोण जबाबदार आहे याकडे लक्ष देण्यापेक्षा आज जर अजितदादा असते तर गुन्हेगारांनी डोकं वर काढला असता का हा असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडले आहे



