अखेर तो विद्युत खांब स्थलांतरित झाला, बांधकाम समिती सभापती सुनील जाधव यांच्या प्रयत्नांना यश अनेक वर्षाचा प्रश्न मार्गी लागला
शिरूर प्रतिनिधी
शिरूर शहरातील सुभाष चौक ते सोनार आळी या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षापासून गणपती विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या दोन विद्युत खांबांचे स्थलांतर स्थानिक नगरसेवक व बांधकाम समितीचे सभापती सुनील जाधव यांच्या प्रयत्नामुळे करण्यात आले.

शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अनेक वर्षांचा प्रश्न
मार्गी लागला असून गेल्या अनेक वर्षापासून गणपती व नवरात्रीमध्ये विसर्जन मार्गावर या रस्त्यावर दोन खांब येत असल्याने अनेक विसर्जन मिरवणुकीचे वाहतूक करणारे टेम्पो ट्रक यांची अडचण होत होती त्यामुळे अनेक वेळा विद्युत पुरवठा बंद करून या ठिकाणी वाहतूक सुरू करावी लागत होती गेल्या अनेक वर्षापासून दहा प्रश्न प्रलंबित होता मात्र नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम समितीचे सभापती सुनील जाधव यांनी पुढाकार घेऊन वीज वितरण कंपनीचे अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हे दोन्ही विद्युत खांब बाजूला करण्यात आले त्यामुळे भविष्यात या ठिकाणी विसर्जनाची वाहतूक सुरळीत होईल असे मत सुनील जाधव यांनी व्यक्त केले .
सुभाष चौक ते सोनारआळी या रस्त्यावरील हे विद्युत खांब स्थलांतर झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि श्वास सोडला असून नागरिकांनी जाधव यांचे आभार मानत वारंवार यामुळे वीजपुरवठा खंडित होत होता त्यामुळे अनेक वर्षाचा प्रश्न मार्गी लागल्याने नगराध्यक्ष पाचर्णे सह जाधव यांचे आभार प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिकांनी मानले आहे.
