Uncategorized
उपसरपंच यांच्या गाडीला अपघात ,चार जण किरकोळ जखमी
शिरुर ama9 वृतसेवा
उरळगाव ता . शिरुर येथील उपसरपंच रफीक शेख यांच्या गाडीला दिनांक २७ रोजी पहाटे चार वाजता तळेगाव न्हावरा रोड्वर दहीवडी जवळ पारोडी फाटा अपघात झाला त्यात शेख हे सुखरुप वाचले तर चार जण किरकोळ जखमी झाले .
या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले . या बाबत माहीती पुढील प्रमाणे उरळगावचे उपसरपंच रफिक शेख हे आपल्या कुटुंबियान समवेत गाडी क्र . एम एच १२ यु जे ६०८५ या गाडीतुन कर्नाटक येथे कार्यक्रमासाठी गेले होते . तेथुन घरी येत असताना पारोडी फाट्या जवळ समोरुन येणार्या वाहनाच्या लाईटमुळे शेख यांची गाडी रोड कडेला जाउन पलटी खाउन खड्यात गेली गाडीत चार जण व शेख यांची लहान मुलगी होती यातील लहान मुलीला काही झाले नाही मात्र गाडीतील चार जण किरकोळ जखमी झाले . त्यांना शिरुर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असुन गाडीची अवस्था पाहील्या नंतर नशीब बलवत्तर होते म्हणुन सर्व जण वाचले अशी भावना या वेळी शेख यांनी व्यक्त केली .


