Uncategorized
शिरुर मध्ये दोन ज्येष्ट महिलांना वाहनाने उडवले
शिरुर ama9 वृतसेवा
शिरुर शहरातुन जाणार्या पुना नगर रोडवर मुथ्था पेट्रोल पंपा जवळ फिरायला गेलेल्या दोन जेष्ट महिला नागरिकांना एका वाहनाने धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या मात्र घटना घडुन तीन तास झाले तरी शिरुर पोलीस स्टेशन चा ना कुठला पोलीस व अधिकारी फिरकला नसल्याचे या कुटुंबियांनी सांगितले ११२ या नंबर वर फोन करुन सुध्दा या ज्येष्ट महिला नागरिकांना मदत मिळु शकली नाही .
या बाबत माहीती पुढील प्रमाणे
अलका सुभाष चोरडिया वय,64 ,
भारती धन्यकुमार मुथा वय 62 या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत . भारती मुथा यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली असुन तर अलका चोरडिया यांनचा हात मोडला असुन अनेक ठिकाणी त्यांना मार लागला आहे . अलका चोरडिया ह्या माजी उपनगराध्यक्षा असुन हि घटना सायंकाळी साडे पाच वाजता घडली दोघींना शिरुर मधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . दोन्ही ज्येष्ट महिला नागरीक ह्या नेहमी प्रमाणे जिजामाता उद्यानात फिरायला जात असताना रस्ता ओलांडताना एका रिक्षाने धडक दिली . त्यात त्या जखमी झाल्या . जिजामाता उद्यान ते बस स्थानक परिसरात अनेक वाहने वेडीवाकडे पणे चालवत असतात त्या ठिकाणी अनेक महिला फिरायला जात असतात मात्र या ठिकाणी कुठलाही वाहतुक पोलीस नसतात या ठिकाणी चालणे सुध्दा कठिण झाले आहे .
चौकट
घटना घडल्या नंतर त्या महीला जाग्यावरच पडुन होत्या उपस्थित नागरिकांनी पोलीस स्टेशनला फोन केला ११२ नंबरला सुध्दा फोन केला मात्र पोलीस घटनास्थळी दाखल झाले नाही . घटना घडुन तीन तास पोलीस रुग्णालयात आले नाही व कुठलीही दखल घेतली नाही . शेवटी त्या ठिकाणच्या नागरिकांनी त्यांना उचलुन रुग्णालयात दाखल केले पोलीसांच्या असंवेदंशील पणाचा प्रत्यय या वेळी नाग रिकांना आला .

