शिरूर तालुकासामाजिक

महिलांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या निर्भया पथकाची जनजागृती करावी नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांची मागणी

शिरूर प्रतिनिधी

महिलांच्या सुरक्षेसाठी कार्यरत निर्भया पथकाबाबत जनजागृती करण्यात यावी अशी मागणी शिरूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांनी एका निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्याकडे केली आहे

या निवेदनात म्हटले आहे की शिरूर शहरामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देणे तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी २४ तास निर्भया पथक कार्यरत ठेवण्याबाबत आपणास यापूर्वी पत्र देण्यात आले होते. त्यानुसार आपण निर्भया पथक कार्यान्वित केले असून त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.

तथापि, सदर निर्भया पथक कार्यरत झाल्याबाबत शहरातील नागरिक, विशेषतः महिला व विद्यार्थिनी यांना माहिती होणे आवश्यक आहे. त्यासाठी सदर निर्भया पथकाची माहिती, संपर्क क्रमांक, कार्यपद्धती तसेच महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील उपलब्ध सुविधांची व्यापक जनजागृती करण्यात यावी.

 

 

यासाठी शहरातील प्रमुख ठिकाणी फलक, बॅनर्स, पत्रके, शाळा-महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन कार्यक्रम, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना या निर्भया पथकाचा लाभ  घेता येईल व  महिलांनमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल

तरी सदर बाबीस प्राधान्य देऊन आवश्यक कार्यवाही करावी असे या निवेदनात म्हटले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button