राजकीयशिरूर तालुका

उद्योग, रोजगार आणि विकासाचा आवाज विधान परिषदेत : प्रकाश भाऊ धारिवाल यांना संधी मिळावी

शिरूर प्रतिनिधी
जून महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेचे निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून पुणे जिल्ह्यातील जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये जबाबदार रस्सीखेच चालू असून ज्या पक्षाला ही जागा मिळेल त्या पक्षाचा आमदार हा निश्चित विजय होणार असल्याने या जागेसाठी दोन्ही पक्षांमध्ये तर चुरस असून येत्या काही दिवसात कोणत्या पक्षाला ही जागा मिळेल हे स्पष्ट होणारच आहे

 

पुणे जिल्ह्यातील जागेसाठी अनेक जण इच्छुक असल्याचे पुणे जिल्हा हा स्व.अजित पवार यांचा बालेकिल्ला होता अजित दादा असते तर ही जागा निश्चित राष्ट्रवादीकडे गेली असती या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर झाला असता मात्र पुणे जिल्ह्यात अनेक जण इच्छुक असले तरी शिरूर शहरातून उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल यांना उमेदवारी मिळावी अशी शिरूरकर यांची भावना असून गेल्या अनेक वर्षापासून शिरूरकरांना न्याय मिळाला नसून प्रकाश भाऊ धारीवाल यांच्या रूपाने न्याय मिळू शकतो अशी भावना संपूर्ण शिरूर तालुक्यातील तसेच नागरिकांच्या त्यांना या विधान परिषदेचे उमेदवार द्यावी अशी इच्छा अनेक जणांनी व्यक्त केली आहे

आज पर्यंत विधान परिषदेवर शिरूर शहरातून कोणाला संधी मिळाली नसून या निमित्ताने धारीवाल कुटुंबीयांना न्याय मिळू शकतो अशी भावना शिरूरकरांच्या असून शिरूर शहराच्या राजकारनात धारिवाल कुटुंबाचे चार पिढी या शिरूर नगर परिषदेच्या राजकारणात सक्रिय आहे

स्व. रसिकभाऊ धारिवाल यांनी दोनदा विधानसभेची निवडणूक लढवली होती व त्यात त्यांचा पराभव झाला होता प्रसिद्ध उद्योगपती स्व.रसिकभाऊ धारिवाल यांचे सुद्धा सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात संपूर्ण देशात मोठे काम होते शहरातील नगराध्यक्ष पदावर सुद्धा अनेक वर्ष त्यांनी काम केले त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत प्रसिद्ध उद्योगपती प्रकाशभाऊ धारीवाल यांनी सुद्धा संपूर्ण देशासह देशाच्या बाहेर सुद्धा शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रात चांगले काम केले असून अनेक धार्मिक स्थळांना मोठमोठे देणग्या या तसेच शैक्षणिक संस्थेला मोठे मोठे देणग्या व शैक्षणिक संस्था उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असून सर्वच राजकीय पक्षातील ज्येष्ठ नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार, स्व. अजितदादा पवार सह सर्वच पक्षातील प्रमुखांचे प्रकाशभाऊ धारीवाल यांचे घनिष्ठ संबंध आहेत

शिरूर शहरात प्रकाश भाऊ धारीवाल यांचे धार्मिक सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत मोठे काम असून 2007 पासून 2020 पर्यंत शिरूर नगर परिषदेवर त्यांची सत्ता होती व ते स्वतः नगराध्यक्ष होते सत्तेच्या माध्यमातून विविध विकास कामे शिरूर शहरात त्यांनी केली तसेच तालुक्यात सुद्धा त्यांच्या जनसंपर्क दांडगा असून विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावत असतात ते कुठल्याही पक्षाचे जरी नसले तरी सर्व पक्षांचे त्यांचे अत्यंत जवळचे संबंध असून शिरूर तालुक्याच्या राजकीय जडण घडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे माजी आमदार स्व.बापूसाहेब थिटे पासून तर ते आता सध्याचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या सर्व सर्वांशी त्यांचे चांगले संबंध आहेत त्यामुळे शिरूर शहरातील एक नाव विधान परिषदेसाठी पुढे येत असून शिरूरकरानी आपल्या भावना व्यक्त करताना प्रकाश भाऊ धारीवाल यांना विधान परिषदेतून संधी देऊन त्यांना आमदार करून धारिवाल कुटुंबांना न्याय द्यावा अशी भावना शिरूरकर यांनी व्यक्त केली असून प्रकाश भाऊ धारिवाल यांचे कार्य बघता त्यांना ही संधी मिळाल्यास सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होणार आहे.

 

शिरूर शहरातील विविध संस्थेवर प्रकाश भाऊ धारीवाल यांची अध्यक्ष म्हणून कार्यरत असून गेल्या पाच दसकापासून शिरूर शहराच्या राजकारणावर मजबूत पकड असलेले धारिवाल कुटुंबीयांना विधान परिषदेच्या आमदारकीच्या माध्यमातून न्याय मिळावा अशी समस्त भावना व्यक्त केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button