शिरूर येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर व्हावे – माजी आमदार अशोक पवार यांची मागणी

.शिरूर प्रतिनिधी
शिरुर (जि.पुणे) येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर व्हावे
अशी मागणी शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे
संदर्भातील एक निवेदन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण प्रकाश आबिटकर यांना दिले असून
मंत्री प्रकाश आबिटकर यांना मुंबई येथे भेटूनभेटून शिरूर येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करणे बाबत निवेदन दिले
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की
दि. 25 एप्रिल 2026 रोजी शिरुर येथे सुप्रिया नितेश काळे या महिलेला प्रसुती कळा असहय झाल्याने त्यांची शिरुर रस्त्यानजिक पदपथावर डॉ. सुनिता संतोष पोटे (नगरसेविका-शिरुर नगरपालिका) यांच्या प्रयत्नाने सुखरुप प्रसुती झाली. त्यामुळे डॉ. सुनिता पोटे यांच्यावर सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
रांजणगांव गणपती पंचतारांकीत एमआयडीसीमुळे शिरुर शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांना सर्व सोई सुविधा वेळेवर उपलब्ध होणेकरिता शिरुर शहरात उपजिल्हा रुग्णालयाची आवश्यकता आहे. तरी शिरुर (जि. पुणे) येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर होणेबाबत सहकार्य करून करून उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावी अशी मागणी अशोक पवार यांनी यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली.
शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता उपजिल्हा रुग्णालयाची गरज असून या उपजिल्हा रुग्णालयामुळे अनेक नागरिकांची तसेच रुग्णांची सोय होणार असून माजी आमदार अशोक पवार यांनी केलेल्या या मागणीमुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे



