राजकीयशिरूर तालुका

… आणी मा. आमदार स्व. बाबूराव पाचर्णे यांचे स्वप्न पूर्ण होणार

शिरूर  प्रतिनिधी 
शिरूर नगर परिषदेच्या सत्ताधारी राष्ट्रवादी व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या फारकतीनंतर राष्ट्रवादीला पाठिंबा देणाऱ्या भारतीय जनता पार्टीला उपनगराध्यक्ष पद मिळण्याची शक्यता असून रोजी शुक्रवार दिनांक सहा रोजी उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडणार आहे
नगर परिषदेचे मध्ये भारतीय जनता पार्टीचे 11 नगरसेवक राष्ट्रवादीचे सात नगरसेवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पाच नगरसेवक व एका अपक्ष असे 24 नगरसेवक असून नगरपालिकेत सत्ता स्थापनेच्या वेळेस राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार या पक्षाची युती झाली होती.

 

त्यांनी शिरूर नगरपरिषद गट स्थापन केला होता व सर्व समित्यांमध्ये या दोन्ही पक्षाचे नगरसेवक विराजमान झाले होते मात्र मागील महिन्यात झालेल्या राजकीय घडामोडीनंतर उपनगराध्यक्ष मितेश गादीया यांच्यावर अविश्वास ठराव आणून वीस विरुद्ध शून्य मतांनी हा अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर गादीया यांना पायउतार व्हावे लागले त्यानंतर त्याआधी भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिरूर नगरपरिषद गटाला पाठिंबा देण्याचा पत्र दिले होते त्यामुळे भाजपचा नगरसेवक उपनगराध्यक्षपदी निवड होणार यामुळे भाजपचे गटनेते नितीन पाचर्णे हे उपनगराध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता असून शिरूर नगर परिषदेचे अध्यक्षपदी पाचर्णे व उपनगराध्यक्षपदी पाचर्णे असे चित्र शिरूर शहराच्या इतिहासामध्ये प्रथमच पाहावयास मिळणार असून शिरूर हवेलीचे माजी आमदार स्व.बाबुराव पाचर्णे यांचे एक स्वप्न होते की शिरूर शहरांवर नगराध्यक्ष हा पाचर्णे कुटुंबीयांचा असावा स्वप्न पूर्ण होतात उपनगराध्यक्षपदी आमदार पाचर्णे यांचे पुतणे नितीन पाचर्णे यांची वर्णी लागण्याची शक्यता असून या निमित्ताने माजी आमदार पाचर्णे यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे

 

शिरूर नगर परिषदेच्या इतिहासामध्ये प्रथमच दोन्ही पदावर पाचर्णे आडनावाचे व्यक्ती विराजमान होणार असून गेल्या पाच दशकावून शिरूर शहर व पंचकोशीवर राज्य करणारे पाचर्णे कुटुंबीय नगरपालिकेत सत्ता स्थानी पोहोचू शकले नव्हते

 

नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांची निवड झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पाचर्णे कुटुंबीयांचे नाव नगराध्यक्षपदी लागले गेले उपनगराध्यक्षपदी नितीन पाचर्णे यांचे निवड झाल्यानंतर दोन्ही पदावर एकाच आडनावाचे व्यक्ती हे विराजमान होणार आहे यामुळे माजी आमदार स्व.बाबुराव पाचर्णे यांचे स्वप्न पूर्ण होणार आह

चौकट

नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांचे सासरे व नगरसेवक अभिजीत पाचर्णे यांचे वडील स्व. माजी नगरसेवक गणेश पाचर्णे हे सुद्धा उपनगराध्यक्ष पदी विराजमान झाले होते गणेश पाचर्णे यांच्यानंतर दुसऱ्यांदा नितीन पाचर्णे यांच्या रूपाने पुन्हा एकदा पाचर्णे कुटुंबीयांना उपनगराध्यक्ष पद मिळणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button