Uncategorizedपुणे जिल्हाराजकीयशिरूर तालुका

रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना कोणामुळे बंद पडला

कामगार नेते महादेव मचाले यांचे मोठे वक्तव्य

शिरूर ama9 
चालू वर्षी घोडगंगा कारखाना सुरू न झाल्याने कामगारांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी राजकीय मतभेद दूर ठेवून शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत तुमच्या राजकिय द्वेषा पायी सहाशे कामगार व हजारो सभासद यांना बेघर करु नये  अशी मागणी घोडगंगा साखर कारखान्याचे कामगार नेते महादेव मचाले यांनी पत्रकार परिषदेत केली.
शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद असून कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बोलताना महादेव मचाले म्हणाले की,शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना चालू वर्षी आर्थिक अडचणीत असल्याने या वर्षी सुरू झाला नाही.एकही दिवस गाळप न झाल्याने कारखाना पूर्णपणे बंद पडला असून सातत्याने  कामगारांवरच कारखाना बंद पाडल्याचे खापर फोडलं जात आहे.मात्र वास्तविक घोडगंगा साखर कारखाना कामगारांनी गेली अनेक वर्षे कारखाना मोठ्या कष्टाने चालवला.कामगारांना पगार न मिळाल्याने विविध प्रकारचे आंदोलन केली मात्र हाती काहीच लागलं नसून कामगारांची निराशा झाली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रथम बैठक घेऊन कामगारांची तीन पगाराची मागणी असताना केवळ एक पगार घ्या व बाकी रक्कम एफडी करा असे सांगितले.त्यामुळे बैठक निष्फळ ठरली. एन सी डी सी बॅंकेकडे कारखान्याने ६५ कोटी रुपये कर्जाचा प्रस्ताव दिला होता मात्र  फक्त ३५ कोटी रुपये बॅंकेकडुन मंजुर करण्यात आले मात्र ते कारखान्याला न देता बॅकेने थेट सभासद व उसतोड वाहतुकीसाठी पैसे दिल्याने पुढील अडचण निर्माण झाली .
राज्यातील इतर कारखान्यांना मदत करत असताना घोडगंगा कारखान्याला जाणीवपूर्वक मदत देण्याचे टाळले.राजगड तसेच सातारा जिल्ह्यातील मकरंद पाटील यांच्या कारखान्याला थकीत असताना ही कर्ज वाटप केले.असा आरोप करत मांडवगण फराटा येथील सभेतही, माझ्याशिवाय कारखाना कोणीच सुरू करू शकत नाही असे सांगितले.चालू वर्षी घोडगंगा साखर कारखाना चालू न झाल्याने कारखाना कामगारांचे,सभासदांचे मोठे नुकसान झाले असून अजित पवार यांच्यामुळेच कारखाना सुरू झाला नसल्याचा आरोप त्यांनी केला.
केवळ आमदार अशोक पवार हे अजीत पवार  यांच्या बाजुने न गेल्या मुळे कारखान्याला मदत न करण्याची भुमिका पार पडली .
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर तालुक्यातील कारखाना कामगारांचे हित लक्षात घेऊन अशोक पवार यांच्याशी असलेले मतभेद बाजूला ठेवून कारखाना चालू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशीही मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब मासाळ,मारुती नागवडे,अनिल शेलार,शिवाजी कोहोकडे, कांतीलाल साळुंके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button