शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील हाच आमचा पक्ष
माजी महिला बाल कल्याण समिती सभापती अंजली थोरात यांचे वक्तव्य
शिरुर ama9
शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव हे आमचे नेते असुन आढळरावच हेच आमचा पक्ष असुन ते ज्या पक्षात जातील त्यांच्या बरोबर आम्ही राहणार असल्याचे मत शिरुर नगरपालीकेच्या महिला बाल कल्याण समितीच्या माजी सभापती अंजली थोरात यांनी ama9 शी बोलताना व्यक्त केले .
शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चीत झाला असुन त्या पार्श्वभुमीवर थोरात यांनी आपली भुमिका स्पष्ट केली .
थोरात म्हणाल्या कि माझ्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबियातील महिलेला शिवसेनेच्या माध्य्मातुन शिरुर नगरपरिषदेच्या २०१६ च्या निवडणुकीत उमेदवारी देउन नगरसेवक पदाचे काम करण्याची संधी शिवाजीदादांन मुळे मिळाली त्या मुळे शिवाजीदादा हेच आमचा पक्ष ते ठरवतील तेच धोरण ,ते बांधतील तेच तोरण ते ज्या पक्षात जातील त्या पक्षात आम्ही त्यांच्या बरोबर असणार असुन शिरुर लोकसभेच्या निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवडुण आणण्यासाठी प्रामाणीक प्रयत्न करणार असल्याचे थोरात यांनी सांगितले .पालीकेचे सभागृह नेते प्रकाश धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली व आढळराव यांच्या
माध्य्मातुन शिरुर शहराला जवळपास आठ कोटी रुपयांचा निधी मिळाला असुन विकास कामे सुरु झाली असुन ७२ कोटीची पाणी पुरवठा योजना मार्गी लागली आहे या मुळे शिरुर शहराचा विकास होउन शिरुर शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे .


