शिरुर येथे ७१ कोटी रुपयांच्या नविन पाणी पुरवठा योजनेचा उद्या होणार भुमीपुजन
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रयत्नातुन

शिरुर ama9
शिरुर शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता शिरुरकरांनचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या पाणी प्रश्न संदर्भात घोड धरणावरुन शिरुर शहरा साठी नविन पाणी पुरवठा (७०कोटी ६० लाख रुपये )योजनेचा भुमीपुजन समारंभ दिनांक ११ मार्च रोजी पार पडणार आहे .
या पाणी पुरवठा योजनेचा शिवसेना उपनेते ,माजी खासदार व म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातुन झाली मंजुर झाली असुन या पाणी पुरवठा योजनेचा भुमीपुजन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते होणार असुन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रसिध्द उद्योगपती व सभागृह नेते प्रकाश धारीवाल हे असणार आहे तसेच शहरातील विविध भागातील योजनेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रयत्नातुन शिरुर शहरासाठी पाणी पुरवठा योजना धरुन ७८ कोटी ६२ लक्ष निधी मिळुन दिला आहे .
दिनांक ११ रोजी सकाळी ११ वाजता पाबळ फाटा ,शिरुर येथे हे भुमीपुजन होणार असुन या कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे ,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रविंद्र काळे ,भाजप तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे ,शिवसेना तालुका प्रमुख रामभाउ सासवडे ,शिवसेना उपजिल्हा प्रमुख अनिल काशीद ,युवा सेना जिल्हा प्रमुख बापुसाहेब शिंदे ,आर पी आय तालुका अध्यक्ष सुहास कदम ,शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार ,भाजप शहर अध्यक्ष नितीन पाचर्णे ,शिवसेना शहरप्रमुख मयुर थोरात ,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष शरद कालेवार ,आर पी आय शहरअध्यक्ष निलेश जाधव सह भाजप ,शिवसेना ,राष्ट्र्वादी चे कार्यकर्ते व नागरीक उपस्थित राहणार आहेत .


