पुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक
प्रसिध्द उद्योगपती स्व .रसिकलालजी धारीवाल यांच्या ८५ व्या जयंती निमित भव्य रक्तदान शिबीर
प्रकाशभाउ धारीवाल मित्र मंडळाच्या वतिने शिबिराचे आयोजन

शिरुर ama9
प्रसिध्द उद्योगपती व शिरुर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष स्व . रसिकलालजी धारीवाल यांच्या ८५ व्या जयंती निमित्त भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे

देशाचे दानशुर उद्योगपती स्व रसिकलालजी धारीवाल यांची १ मार्च रोजी ८५ वी जयंती असुन त्या निमित्ताने शिरुर शहर व पंचक्रोशीतील प्रकाशभाउ धारीवाल मित्र मंडळाच्या वतिने हे रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले आहे .

दिनांक १ मार्च रोजी शिरुर नगरपरिषद मंगल कार्यालयामध्ये सकाळी ८ ते सायं. ६ वाजे पर्यंत हे शिबीर आयोजीत करण्यात आले असुन या शिबीराचे उद्घाटन प्रकाशभाउ धारीवाल व दिनाभाभी प्रकाशभाउ धारीवाल यांच्या हस्ते होणार आहे . रसिकभाउ धारीवाल यांच्या ८५ व्या जयंती निमित्ताने प्रदुषण मुक्त व्हावे पर्यावरण या साठी ८५ सायकलचे वाटप करण्यात येणार आहे .


