पुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक
शिरुर येथे सकल मराठा समाजाच्या वतिने रास्ता रोको
मराठा योध्दे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत हा रास्ता रोको
शिरुर ama9
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मराठा योध्दे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी शिरुर शहर सकल मराठा समाजाच्या वतिने रास्ता रोको करण्यात आले .
दि .२४ रोजी पुणे नगर महामार्गावर पुणे जिल्ह्याच्या वेशीवर सतरा कमानी पुलाजवळ रास्ता रोको करण्यात आला या वेळी मनोज जरांगे तुम आगे बढो ,एक मराठा लाख मराठा ,कोण म्हणतय देणार नाही घेतल्या शिवाय राहणार नाही अशा घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला .

या वेळी सकल मराठा समाजाचे सतिष धुमाळ ,प्रकाश थोरात ,गणेश जामदार ,उर्मिला फलके यांनी आपल मनोगत मांडले सर्वांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा देत सरकारने लवकरात लवकर सगेसोयरे अध्यादेश काढावा व समाजाला आरक्षण लागु करावे अशी मागणी या वेळी केली .
या रास्ता रोको आंदोलनामुळे दोन्ही बाजुंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या भर कडक उन्हात मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते .
या वेळी समाजाच्या वतिने निवेदन देण्यात आले . हे निवेदन मुख्य्मंत्री यांच्या नावाने देण्यात आले . यात
मराठा क्रांती योध्दा जरांगे पाटील यांनी ज्या मागण्यांसाठी आंदोलन चालू केले आहे. त्यामध्ये सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी तसेच मराठा आंदोलकांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत व आंदोलनातील सर्व मागण्या करण्यासाठी समाज आता रस्त्यावर उतरत आहे याचे दुष्परिणाम सर्व साधारण जनतेवर नक्कीच होईल याची दखल सरकारने तत्काळ घेवून ज्या काही मागण्या असतील त्याचा विचार करून त्या सर्व लवकरात लवकर पूर्ण कराव्यात व मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लावावा अशी मागणी करण्यात आली .
या वेळी उर्मिला फलके, संपत दसगुडे , सुनील जाधव , संभाजी कर्डिले ,शामकांत वर्पे , संतोष शितोळे ,सुदाम कोलते ,सतिष धुमाळ , गणेश जामदार , प्रकाश थोरात , जयवंत साळुंके , महेंद्र येवले, अविनाश जाधव , सागर नरवडे , अविनाश घोगरे ,उमेश शेळके ,योगेश महाजन ,राजेंद्र जाधवराव ,सुनील जठार ,सूरज काळे, शेखर दळवी , स्वप्नील रेड्डी , यश धनी , अनिल पवार , शरद ओहळ , सूरज पाचंगे, बापू शिंदे , सिद्धेश चव्हाण , रमेश दसगुडे, रुपेश घाटगे आदी सह शेकडो मराठा बांधव या वेळी उपस्थित होते .
या रास्ता रोको साठी पोलीस निरिक्षक ज्योतीराम गुंजवटे ,सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप यादव ,अमोल पन्हाळकर , पोलीस हवालदार राजेंद्र वाघमोडे ,शेखर झाडबुके ,राजेंद्र गोपाळे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला .


