पुणे जिल्हाराजकीयशिरूर तालुका
शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची म्हाडा च्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल शिरुर मध्ये जल्लोष
शहर प्रमुख यांनी केले पेढे वाटप
शिरुर ama9
शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळ (म्हाडा ) च्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल शिरुर शहर शिवसेनेच्या वतिने पेढे वाटुन आनंद साजरा केला .

या वेळी शहर प्रमुख मयुर थोरात ,शहर संघटक सुरेश गाडेकर ,उपशहर प्रमुख भरत जोशी,सागर गव्हाणे ,गणेश गिरे ,तालुका संघटीका सुमन साळवे ,शहर संघटीका अर्चना सोनवणे ,भाजपचे प्रितेश गादीया ,विभागप्रमुख कौशल क्षिरसागर ,शाखा प्रमुख राहुल गायकवाड व नागरीक उपस्थित होते .
या वेळी बोलताना शहर प्रमुख मयुर थोरात म्हणाले कि शिवाजीदादा हे सर्वसामान्य माणसांचे काम करणारे नेते असुन मागील पाच वर्षात पराभुत होउन सुध्दा त्यांनी गेल्या पाच वर्षात जनसंपर्क कायम ठेउन नागरीकांनचे प्रश्न सोडवुन करोडो रुपयांचा निधी सरकारच्या माध्यमातुन आणलाआगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी शिवाजीदादांनाच उमेदवारी मिळेल असा आशावाद या वेळी मयुर थोरात यांनी व्यक्त केला .


