शिरुर शहर व पंचक्रोशी पुन्हा एकदा आढळराव पाटील यांच्या पाठीशी भक्कम उभे राहतील
युवा नेते अपुर्व आढळराव पाटील यांचा विश्वास

शिरुर ama9
शिरुर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मागील पाच वर्षात खासदार नसतानाही त्यांनी शिरुर शहर व पंचक्रोशीसाठी करोडो रुपयांचा निधी मिळुन दिला त्या मुळे शिरुर शहर व परिसरातील नागरीक आढळराव पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहतील असा विश्वास युवा नेते अपुर्व शिवाजी राव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला .

शिरुर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार म्हणुन शिवाजीराव आढळराव पाटील असुन त्यांच्या प्रचारासाठी युवा नेते अपुर्व आढळराव पाटील यांनी शिरुर शहरातील नागरिकांची तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेतली व आढळराव यांनी केलेल्या कामाची माहीती दिली तसेच महायुतीच्या सरकारने केलेल्या कामाची माहीती नागरीकांना दिली .

गेल्या तीन निवडणुकीत शिरुर शहराने आढळराव पाटील यांच्यावर विशेष प्रेम करत मताधिक्याच्या रुपाने त्यांच्यावर प्रचंड विश्वास दाखविला आहे तसाच विश्वास २०२४ च्या निवडणुकीत शिरुर शहर व पंचक्रोशीने जास्तीत जास्त मताधिक्य देउन दाखवावा अशी विनंती या वेळी अपुर्व आढळराव पाटील यांनी या वेळी केली .

या वेळी आढळराव यांनी शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड सुभाष पवार ,जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल पाचर्णे ,माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे ,दादापाटील घावटे ,माजी सरपंच अरुण घावटे ,विट्ठल घावटे ,लोकशाही क्रांती आघाडीचे रविंद्र धनक, माजी नगराध्यक्ष नसीम खान ,राष्ट्रवादीचे युवा नेते राजेंद्र गावडे ,सामाजीक कार्यकर्ते प्रदीप गादीया ,माजी नगरसेविका संगिता मल्लाव ,शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती अविनाश मल्लाव ,अमोल वर्पे ,विलास कर्डिले ,मितेश गादीया आदी ची भेट घेतली .
या वेळी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष शरद कालेवार ,शिवसेना शहर प्रमुख मयुर थोरात ,शिरुर शहर संघटक सुरेश गाडेकर उपस्थित होते .



