Uncategorized
शिरुर मध्ये अंतर्गत वाद उफाळला
शिरुर ama9 वृतसेवा
” ह्याला काढ ,त्याला काढ ” ह्याची जिरव त्याची जिरव असा शाप असलेल्या शिरुर तालुका व शहर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात पुन्हा एकदा अंतर्गत वादाने उफाळी घेतली असुन पक्ष फुटी नंतर सुध्दा शिवसैनीकानी त्या पासुन बोध घेतला नाही .
या मागील कारण म्हणजे विद्यमान शहरप्रमुख सुनील जाधव यांची सात महिन्यात शहर प्रमुख पदावरुन बदलुन त्यांच्या जागी नविन नियुक्ती झाल्याने पक्षातील अंतर्गत वाद उफाळुन आल्या नंतर काही पदाधिकार्यानी राजीनामा देण्याचा इशारा दिला . या बदली मागे पक्षातील एक मोठा पदाधिकारी असल्याचा आरोप शिवसैनिकानी केला . शिरुर शहर व तालुक्याला हा वाद नविन नाही . गेल्या ३० वर्षापासुन ह्याला काढ त्याला काढ एवढच या पक्षात चालले असुन पक्षात एवढी मोठी फुट पडल्या नंतर वरिष्ठान सह तालुक्यातील पदाधिकार्यानी काही गोष्टी लक्षात घ्यायला पाहीजे .
सुनील जाधव युवासेना तसेच श्री राम सेनेच्या माध्यमातुन चांगले संघटन तयार केले आहे . त्यांच्या मागे तरुणानचा एक मोठा वर्ग आहे . शिवसेना युवा सेना मध्ये २०११ पासून त्यानी १२ वर्षे युवा सेना चे शहर अधिकारी म्हणून काम केलं प्रामाणिक पणे ते पाहून त्यांची १० ऑगस्ट २०२२ रोजी त्याना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षा ने शहर प्रमुख म्हणून काम करण्याची संधी दिली ७ ते८ महिने त्यानी जोरदार काम केल आहे उपोषण आंदोलन सामजिक कामे पक्षाची कामे विविध कार्यक्रम त्यानी केलं आहे .
संघटन बाबी कमी पडले असे कारण देउन जाधव याना पाय उतार व्हावे लागले मात्र सात महिन्यात कामाचे काय मुल्यमापन होणार असा सवाल शिवसैनिकानी करत उलट पक्षाच्या पडझडीनंतर सभासद नोंदणी ,प्रतिज्ञापत्र हे सर्व जास्तीत देण्याचा प्रयत्न केला असल्याचे शिवसैनिकानी सांगितले . नविन नियुक्ती केलेले शहर प्रमुख संजय देशमुख हे गेले बारा वर्ष शहर प्रमुख होते . त्याना बढती देत जिल्हा संघटक म्हणुन पद देण्यात आले होते . त्यानी नगरसेवक म्हणुन काम केले असुन माजी खासदार शिवाजीराव आढळराव ज्या वेळेस शिवसेनेत होते त्या वेळेस त्यांचे अत्यंत जवळचे म्हणुन देशमुख यांची ओळख होती . देशमुख याना पदावरुन दुर करण्यासाठी त्या वेळेस सुध्दा अनेक प्रयत्न झाले मात्र त्यावेळेस यश आले नाही .
शिवसेना फुटी नंतर शिरुर तालुक्यात व शहरात बहुतांशी शिवसैनिकानी उध्दव ठाकरे यांच्या बरोबर राहणे पसंद केले . पक्षाला सध्या तरुण युवकांची ,नविन फळीची गरज असताना सुनील जाधव यांच्या सारखा तरुण चेहरा शिव्सेनाला मिळाला असताना अंतर्गत राजकारण ,जिरवाजिरवी ,वरिष्ठाना चुकीची माहीती देणे ,अशा कुरघोडी चांगले पदाधिकारी संघटने पासुन दुर जाउ लागले आहे . संघटनेचा स्वता साठी फायदा करुन घेउन स्वताची राजकीय पोळी भाजुन घेउन संघटनेसाठी आपण काय केले व संघटनेमुळे आपला किती फायदा झाला याचे आत्मपरिक्षण जुन्या पदादिकार्यानी करणे गरजेचे असुन वरिष्ट पदाधिकार्यानी सुध्दा या वर लक्ष देउन चांगल्या पदाधिकार्याना बळ देणे गरजेचे आहे अन्यथा जिरवाजिरवी मध्ये संघटना संपुन जाईल व शेवटी निष्ठावंतच कामाला येतील हे मात्र तेवढेच खरे .

