संजय पाचंगे यांचे अर्धनग्न आंदोलन सुरुच
शिरूर ama9 महावितरणाचा भ्रष्ट कारभाराचा विरोधात भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी (दिनांक ८ मार्च) पासुन शिरूर तहसील कार्यालया समोर अर्धनग्न आंदोलन हे दुसर्या दिवशीही सुरु असुन गुरवार दिनांक ९ रोजी पाचंगे यानी आपला पायजमा काढुन नायब तहसीलदार शाम पानेगावकर याना दिला .
दरम्यान आज दुसर्या दिवशी विविध संघटनानी या आंदोलनाला भेट देउन पाठिंबा दिला . यात जनता दल सेक्युलरचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाउ शेवाळे ,शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा पाठिंबा सरपंच स्वाती घावटे, उपसरपंच अनिल लोंढे यानी पत्र देउन जाहीर केला . या वेळी माजी सरपंच अरुण घावटे ,विट्ठल घावटे ,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आंबेगाव तालुकाध्यक्ष गणेश जामदार , भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश अहमदनगर चे कार्याध्यक्ष योगेश कुलथे , जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे ,शहर भाजप सरचिटणीस विजय नर्के ,नवनाथ भुजबळ ,नवनाथ जाधव ,शरद रासकर ,निलेश नवले ,तालुका संघटन सरचिटणीस माउली बहिरट आदी उपस्थित होते . आंदोलनाचा भाग म्हणून अंगावरील शर्ट काढून बनियन वर आंदोलन सुरु केले असुन आंदोलनाचा प्रत्येक दिवशी अंगावरील एक एक कपडे काढण्याचा इशारा ही त्यांनी दिला होता . आंदोलनाबाबत अधिक सांगताना संजय पाचंगे म्हणाले की तालुक्यात विजेचे ३६ हजार कृषी ग्राहक आहे. यापैकी अनेकांकडे वीज मीटर नाही. वीजबील बोगस बनविले असून १४ कोटी युनिटचे वीज बील जास्त दाखविले असल्याचा आरोप ही पाचंगे यांनी केला. उन्हाळा मध्ये १५ ते २० % मोटारीचा वापर पाणी नसल्यामुळे होतो. ८० % शेतकरी ग्राहकांच्या वीज मोटारी बंद असतात . तर तीन एचपीचा पुढे वीज कनेक्शन असणा-य शेतक-यांनी वापरलेल्या वीजे पेक्ष्या अधिकचे वीज युनिटचा वापर दाखवून महावितरणने सबसिडीच्या अपहार केल्याचा गंभीर आरोप ही पाचंगे यांनी केला. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी शासनाकडे करण्यात आली असून या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली असुन या प्रकरणी चौकशी समिती नेमावी तसेच या प्रकरणाची चौकशी होउस पर्यंत ३६ हजार शेती पंप ग्राहकांची विज वसुली तसेच विज कनेक्षन तोडु नये अशी मागणी पाचंगे यानी लावुन धरली .
दरम्यान विज वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता केडगाव किशोर शिंदे , उपकार्यकारी अभियंता शिक्रापुर नितीन महाजन , उपकार्यकारी अभियंता शिरुर सोमनाथ माने यानी पाचंगे यांची भेट घेउन त्याना उपोषण व आंदोलन थांबवण्याची विनंती केली . विज वितरण कंपनीच्या वतिने लेखी पत्र देत असल्याचे सांगितले मात्र त्यात पांचगे यानी उपस्थित केलेल्या मुद्यानसंदर्भात स्पष्ट उल्लेख नसल्याने हि चर्चा फिसकटली व पाचंगे हे आपल्या आंदोलनावर ठाम राहीले .

