Uncategorized
विठ्ठल रुक्मिणी पायी दिंडी सोहळयाचे न्हावरे येथे स्वागत
न्हावरे (संजय गायकवाड) ama9 वृतसेवा
पिंपळवाडी (ता.कर्जत)ते श्री. क्षेत्र देहू येथे तुकाराम बीज सोहळ्यासाठी जाणा-या विठ्ठल रुक्मिणी पायी दिंडी सोहळयाचे हरिनामाच्या गजरात व टाळ मृदंगाच्या तालावर न्हावरे (ता.शिरूर) येथील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.
तुकाराम बीज सोहळया निमित्त श्री श्रेत्र देहू कडे पिंपळवाडी येथून विठ्ठल रुक्मिणी पायी दिंडी सोहळा गेली 26 वर्षांपासून जात असून वाटेत ठिकठिकाणी कीर्तन भजन हरिपाठ काकडा भजन आदी.धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहीती दिंडी चालक जेष्ठ कीर्तनकार प्रकाश महाराज जंजिरे यांनी सांगितले. न्हावरे येथील ग्रामपंचायत सदस्य संदीप यादव, विनायक यादव,बाळासाहेब हांडे,प्रेमलता वेताळ यांनी या दिंडी सोहळ्यासाठी व उपस्थित भाविकांसाठी येथील श्री.मल्लिकार्जुन मंदीरात महाप्रसादाचे आयोजन केले होते. तळवडी,चिखलठाणवाडी , इनामगाव,शिरसगाव ,न्हावरे, माळवाडी,मोशी मार्गे ही दिंडी देहूला जाणार आहे.या दिंडी सोहळयात कर्जत तालुक्यातील भक्तजन सहभागी झाले आहे.

