Uncategorized

शिरुर पोलीस स्टेशन च्या वतिने रस्ता सुरक्षा अभियान

शिरुर ama9 वृतसेवा

शिरुर प्रतिनिधी
पोलीसानी व नागरिकानी एकत्रित येवुन रस्ते सुरक्षा अभियान यशस्वी व्हावे या करता प्रयत्न करावेत व नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप यादव यांनी केले .

शिरुर पोलीस स्टेशनचा वतीने रस्ता सुरक्षा अभियान २०२३ चे आयोजन करण्यात आले होते यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव , पोलीस उपनिरीक्षक सुजाता पाटील , एकनाथ पाटील , वाहतुक पोलीस राजेंद्र वाघमोडे , शेखर झाडबुके भाग्यश्री जाधव , यांच्यासह जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर कॉगेस आयचे शहाराध्यक्ष ॲड किरण आंबेकर ,सुवर्णकार समाजाचे शिरुर शहर अध्यक्ष राजेंद्र लोळगे , माजी नगरसेवक विनोद भालेराव ,तर्डोबावाडीचे माजी सरपंच जगदीश पाचर्णे , सामाजिक कार्यकर्ते बापु सानप , अनिल बांडे , सागर नरवडे , अविनाश घोगरे , आदी उपस्थित होते . विनोद भालेराव म्हणाले की अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देवु नये व वाहतुकीच्या नियमाचे पालन करावे . संजय बारवकर यानी ही शहरातील वाहतुकी संदर्भात सुचना मांडल्या . पोलीस उपनिरीक्षक सुजाता पाटील , ॲड किरण आंबेकर , प्रा सतीश धुमाळ व बापु सानप आदीनी यावेळी सुचना मांडल्या .राजेंद्र वाघमोडे यानी वाहतुकी संदर्भतील विविध नियमांची माहिती दिली . फोटो वाहुतक शाखेतील महिला पोलीसाना हेल्मेट चे वाटप करताना तर्डोबावाडीचे माजी सरपंच जगदीश पाचर्णे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button