राजकीयशिरूर तालुका

नागरिकांच्या प्रश्नांसाठी नेहमीच पुढे असलेला कर्तव्यदक्ष नगरसेवक”

शिरूर प्रतिनिधी

मध्यरात्री एक ची वेळ शिरूर शहरातील मुंबई बाजार परिसरात रात्री वडाचे झाड पडून विद्युत तारांवर व खांबावर पडल्याने अचानक या ठिकाणी जाळ होऊन एक अवघड परिस्थिती निर्माण झाली मात्र स्थानिक नगरसेवक व शिरूर नगर परिषदेचे स्वच्छता व आरोग्य समिती सभापती एजाज बागवान यांना ही घटना समजताच त्यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन करून वीज बंद करण्यास सांगत विज बंद करून पुढील अनर्थ टाळला

या बाबत माहिती पुढीलप्रमाणे दिनांक 12 रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास शिरूर शहरात मार्केट यार्डच्या मागील बाजूस, परदेशी यांच्या घरासमोरील एक प्रचंड मोठ वडाचे झाड अचानक रस्त्यावर कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र विद्युत तारा तुटणे व खांब पडल्यामुळे मोठा धोका निर्माण झाला होता.

 

 

 

 

घटनेची माहिती मिळताच स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती सभापती एजाज बागवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले . सर्वप्रथम विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्या परिसरातील लाईट्स व डीपी तातडीने बंद करण्याच्या सूचना दिल्या, जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडू नये. यानंतर नगरपालिका प्रशासनाला निर्देश देऊन JCB, कटिंग मशीन व संपूर्ण टीमला घटनास्थळी बोलावण्यात आले. रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंत स्वतः उपस्थित राहून काम करून घेतले आणि रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आला. संभाव्य मोठी दुर्घटना टळली आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित झाली.

यावेळी स्वच्छता विभागाचे सर्व कर्मचारी यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे मदत केली व संभाव्य धोका टाळला मात्र नगरसेवक पद हे फक्त मिरवण्यासाठी नसतं तर प्रत्यक्ष काम करण्यासाठी असतं हे एजाज बागवान यांच्या कामाने दाखवून दिलं आपण जनतेसाठी असून जनतेच्या प्रश्नासाठी वेळ न पाहता रस्त्यावर उतरणे हे लोकप्रतिनिधीच काम असतं ते काम बागवान यांनी शंभर टक्के केल्याने शिरूर शहर व परिसरात त्यांचे कौतुक होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button