राजकीयशिरूर तालुका

पाच ठरावाला स्थगिती देण्याचे विषयावरून सत्ताधारी गट आक्रमक

शिरूर प्रतिनिधी

 

शिरूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आक्रमक पवित्र्यामुळे सत्ताधारी गटाला पाच ठरावाला स्थगिती देण्यात आल्यानंतर सत्ताधारी गटाकडून सुद्धा त्याला जोरदार प्रतिउत्तर देण्यात आला असून सत्ताधारी गटातल्या नगरसेवकांनी हे सर्व विषय अजंठावर क्रमांक तीन चार पाच हे जे विषय आहे हे भारतीय जनता पार्टीचा नगरसेवकांनी स्वतःच्या लेटर पॅडवर हे विषय सुचविले होते मात्र ऐन वेळेस त्यांनी या विषयाला का विरोध केला याबाबत सर्वांना आश्चर्य वाटत आहे असे सत्ताधारी गटाकडून सांगण्यात आले आहे.

शिरूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मध्ये मागील सर्वसाधारण सभेमध्ये ओपन स्पेस नगर परिषदेत हस्तांतरित करण्याचा ठराव सर्व संमतीने झाला होता व तसेच या सर्वसाधारण सभेमध्ये चार विषय ते भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी सांगितले असल्याचे सत्ताधारी गटाकडून सांगण्यात येत आहे ऐन वेळेस या विषयाला त्यांनी का विरोध केला यामागे काय उद्दिष्ट आहे त्यांचे हे समजत नसल्याचे सत्ताधारी गटाकडून सांगण्यात आलं असून ओपन स्पेस हे नगर परिषदेच्या ताब्यात घेऊन त्याचा विकास करण्यासाठी हा ठराव मागील सभेत मंजूर करण्यात आला होता मात्र विरोधकांनी या ठरावाला मागील सभेत पाठिंबा दिला होता मात्र यावेळेस असे काय घडले की या ठरावाला विरोध करत बिल्डरांचे हित पाहण्याचं काम विरोधकांनी केला असून शिरूर शहराच्या विकासाबाबत हे विरोधक बोलायला तयार नसून शिरूर शहर विकासासाठीच हे विषय होते मात्र या विषयाला विरोध करून त्यांनी शिरूर शहराच्या विकासात खोडा घालण्याचे काम केले असल्याचे सत्ताधारी गटाकडून सांगण्यात आले आहे.

शहरातील ज्वलंत विषायावर वर विरोधकांनी न बोलता केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी व फायद्यासाठी या विषयांना विरोध केला असून. शिरूर शहरात अनेक प्रश्न असताना सुद्धा फक्त स्वतःच्या फायद्यासाठी असलेले विषय त्यांनी घेतले व त्यास विरोध करत कोणाच्या मर्जी राखण्याचं काम केलं आहे हे लवकरच शिरूरकर जनतेला कळेल असे सत्ताधारी गटाकडून सांगण्यात आले आहे.

 

सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांनी विरोधकांना पाठिंबा देत या ठरावाला स्थगिती देण्यासाठी सभागृहात आवाज उठवला अशांना पुढच्या वेळेस सभेला व्हीप बजावला जाईल असे सत्ताधारी गटाकडून सांगण्यात आले आहे नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे ह्या गटनेत्या असून त्या दोन्ही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना व्हीप बजावू शकतात त्यामुळे आगामी सभेमध्ये ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मागील सर्वसाधारण सभेमध्ये सर्व भाजप नगरसेवकांचे सत्ताधारी गटाने 53 विकास कामे मंजूर करून घेतली
सत्ताधारी गटाने शिरूरच्या विकासाबाबत कधीही मतभेद केला नाही जे शहराच्या वैभवात भर घालतील असे विषय सत्ताधारी गटाने सर्व मंजूर केले होते
आजही जे पाच विषय ना मंजूर झाले त्यामधील तीन विषय हे विरोधकांचे होते आणि दोन विषय हे प्रशासकीय विषय होते
आणि स्थगिती ज्या ओपन स्पेसच्या विषयावरती दिली गेली तो पण विषय त्या विषयाला भाजप नगरसेवकाचे अनुमोदन आहे

 

त्यामुळे पहिल्या सभेमध्ये मंजूर करून दुसऱ्या सभेमध्ये त्या विषयावरती स्थगिती आणणे हे सभागृहात नवीन काहीतरी पायंडा पाडण्याचा हट्ट होता नगराध्यक्ष यांनी दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले तरीही स्थगितीसाठी भाजप नगरसेवक आडून होते आणि बहुमत नसल्या कारणाने स्थगिती देण्यात आली असे
सत्ताधारी गटाकडून सांगण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button