राजकीयशिरूर तालुका

शिरूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पाच ठरावाला स्थगिती देण्याची सत्ताधारी गटावर आली पाळी

शिरूर प्रतिनिधी

शिरूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत आज गोंधळ होऊन मागील सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या ठराव स्थगित करण्याची नामुष्की सत्ताधारी पक्षावर आल्याने विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर पाच विषयात स्थगिती देऊन मात केल्याचे चित्र आज सर्व साधारण सभेत दिसून आले.

 

शिरूर नगर परिषदेच्या रसिक भाऊ धारिवाल सभागृहात निवडणुकीचे नंतरची दुसरी सर्व साधारण सभा दिनांक दहा रोजी पार पडली पार पडली. डिसेंबर मध्ये झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर शिरूर मध्ये सत्तांतर राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांचे 12 नगरसेवक व एका अपक्ष असे सत्ता बलाबल झाल्याने या ठिकाणी दोन्ही पक्षाचे नगरसेवक हे सभापती विविध समितींचा सभापती झाले नगराध्यक्षापदी राष्ट्रवादीच्या ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे या निवडून आल्या होत्या त्यामुळे तेरा नगरसेवक नगराध्यक्ष शिरूर नगरपंचायत मध्ये सत्ता स्थापन झाली मात्र अवघ्या दुसऱ्या सभेमध्ये सत्ताधारी गटातील चार नगरसेवक विरोधात गेल्याने सत्ताधारी गटावर मागील सर्व साधारण सभेमध्ये मंजूर झालेल्या ठरावावर स्थगिती देण्याची नामुष्की आली बहुमत नसल्याने या विषयावर स्थगिती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे गटनेते नितीन पाचर्णे संतोष थेऊरकर निलेश पवार सागर नरवडे उमेश शेळके राजेंद्र लोळगे नगरसेविका सुनीता कुरुंदळे पूजा पोटावळे, सुनीता भुजबळ माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे यांनी विविध विषयांना विरोध करत मागील सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर झालेले ठराव यांना विरोध करतत्यांना स्थगिती द्यावी अशी मागणी विरोधकांनी केली केली

 

 

नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे यांनी त्या दुरुस्ती करू असे सुचवल्यानंतर सुद्धा हे नगरसेवक ऐकण्याच्या मनस्थिती नव्हते शेवटी प्रचंड गोंधळात यांना या विषयांना स्थगिती देण्यात आली मागील सर्व सभेमध्ये ऐन वेळेस विषय घेण्यात आला होता ओपन स्पेस ला नगर परिषदेच्या ताब्यात द्यायच्या संदर्भात ठराव मंजूर झाला होता मात्र हा ठराव ऐन वेळेस आला होता त्यामुळे आम्हाला माहीत नव्हते असे उत्तर विरोधकांनी दाखवून देण्यात आले व त्याला स्थगिती द्यावी असे म्हणत विरोधी भाजपच्या नगरसेवक यांनी प्रचंड विरोध केल्यानंतर सत्ताधारी गटातील चार नगरसेवकांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिल्याने सत्ताधारी गटावर ह्याला स्थगिती देण्याशिवाय पर्याय नाही राहिला.

 

 

शिरूर नगरपरिषद पाणी पुरवठा योजनेतील घोडनदीवरील कोल्हापुरी बंधारा येथील नदीपात्र स्वच्छता करणे, गाळ काढणे व अनुषंगिक कामे करणेकरिता मान्यता मिळणेबाबत विचार विनिमय करून निर्णय घेणे.
शिरूर नगरपरिषद येथील हत्तीडोह पंपिंग स्टेशन येथील इंटेकवेल, जॅकवेल, कनेक्टिंग पाईप्स व अनुषंगिक ठिकाणी गाळ काढणे कामासाठी मान्यता मिळणेबाबत विचार विनिमय करून निर्णय घेणे.
शिरूर शहरामध्ये पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना करण्याकरिता आवश्यक त्या ठिकाणी नागरिकांना व अनुषंगिक कामांकरिता भाडे तत्त्वावर पाणी टँकर उपलब्ध करणेकरिता मान्यता मिळणेबाबत विचार विनिमय करून निर्णय घेणे विषयाची गरज नसताना हे विषय घेतल्याने या विषयाला स्थगिती देण्यासाठी विरोधका सह सत्ताधारी गटातील काही नगरसेवक एकत्र आल्याने अशा पाच विषयांना स्थगिती देण्यात आली.

 

भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक यांनी सांगितले की या सर्व विषयात गरज नसताना हे विषय घेण्यात आले व या विषयांमध्ये भ्रष्टाचार होऊ शकतो व सध्या कामाची गरज नसताना याविषयी जाणीवपूर्वक अजंठा वर आणले त्यामुळे आम्ही शिरूर शहराच्या दृष्टीने याला विरोध केला व या कामाला स्थगिती दिली.

नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांनी सांगितले की हे सर्व विषय मागील सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाचे होते व ते सर्व आम्ही घेऊन ते मंजूर केले पण आता हे विरोधी पक्षातील नगरसेवक त्याला विरोध करत असून यामागे त्याचा काय उद्देश आहे ते सांगणे अवघड आहे त्यांची ही मागणी चुकीची वाटत असून शिरूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही योग्य पाऊल टाकत असून फक्त विरोधाला विरोध करणे हे विरोधकांचे काम आहे आमच्या गटातील काही नगरसेवक तिकडे गेल्याने याला आम्ही स्थगिती दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button