दुसऱ्या लग्नासाठी आड येणाऱ्या स्वतःच्या मुलाचा खून करणाऱ्या आईला पोलिसांकडून अटक

शिरूर प्रतिनिधी
दुसरे लग्न करण्यासाठी स्वतःचा मुलगा आड येत असल्याने स्वतःच्या 11 महिन्याच्या मुलाला कपडे धुण्याचे दगडावर आपटून त्याच्या त्याचा खून खून करून त्याचा मृतदेह बॅगमध्ये भरून त्यात दगड दगड टाकून तो विहीरीत टाकून दिल्याची घटना भांबर्डे तालुका शिरूर येथे घडले असून यासंदर्भात रांजणगाव पोलीस स्टेशन मध्ये कुणाचा गुन्हा दाखल असून या संदर्भात मुलाच्या आईला अटक करण्यात आली आहे
रांजणगाव पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे या संदर्भात रवींद्र अशोक पवार वय 36 वर्षे व्यवसाय – शेती, रा. भांबर्डे, पवार वस्ती, ता.शिरूर जि.पुणे यांनी फिर्याद दिली असून खून प्रकरणी आरोपी पूजा रवींद्र पवार,रा. भांबर्डे, पवार वस्ती, ता.शिरूर जि.पुणे अटक करण्यात आली आहे ही घटना दिनांक आठ मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजता घडली
या घटनेत यश रवींद्र पवार वय-11 महिने हा मयत झाला असून फिर्यादी यांनी फिर्याद दिल्या नुसार रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे अकस्मात मयत 5 एप्रिल रोजी मयत दाखल केले होते . त्यानंतर सदर मयताचे अनुषंगाने पोलिसांनी फिर्यादीची पत्नी पूजा रवींद्र पवार यांच्याकडे सखोल तपास केला असता तसेच फिर्यादी यांनी देखील पत्नी पूजा पवार यांच्याकडे विचारपूस केली असता तिने सांगितले की, आम्ही कोकण मुरुड येथून फिरून आल्यानंतर मुलगा कु. यश रविंद्र पवार वय ११ महिने हा नेहमी किरकिर करून रडतो या मुळे कोठेतरी निघून जाऊन दुसरा चांगला नवरा पाहून लग्न करावे, मुलाला सोबत घेऊन गेल्यावर कोणी लग्न करणार नाही असा विचार करून तिने मुलगा कु. यश याचे डोके घरासमोरील कपडे धुण्याचे सिमेंट ओट्यावर आपटवून त्याचा खून केला आहे. त्यानंतर खुनाचा पुरावा नाश करण्याचे उद्देशाने सिमेंट ओट्यावरील फिर्यादीच्या मुलाचे पडलेले रक्त हे पाण्याने धुऊन, सदरची मयत बॉडी घरातील कपड्यांचे बॅगमध्ये भरून मयत बॉडी आमचे शेत जमीन गट नंबर 351 भांबर्डे तालुका शिरूर मधील विहिरीजवळ घेऊन जाऊन बॅग पाण्यात बुडून राहण्यासाठी त्या बॅगमध्ये सोबत दोन दगड भरून मयत बॉडी विहिरीतील पाण्यामध्ये टाकून दिली असल्याचे निष्पन्न झाले आहे. म्हणून पूजा रवींद्र पवार रा.भांबर्डे ता. शिरूर जि. पुणे हिच्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे .
दाखल गुन्ह्यातील महिला आरोपीस गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असून गुन्ह्याचे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर प्रशांत ढोले रांजणगाव पोलीस ठाणे कडील पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके यांनी भेट दिली दिली आहे, घटनास्थळी डॉ. सागर डांगे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, रांजणगाव तसेच फॉरेन्सिक टीम यांनी भेट देऊन तपासात सहकार्य केले आहे, पुढील अधिक तपास उपनिरीक्षक निळकंठ तिडके करत आहे


