शिरूर तालुकासामाजिक

प्रसिद्ध उद्योगपती स्व. रसिकलाल धारिवाल यांच्या जयंती निमित्त शिरूर येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन

शिरूर प्रतिनिधी

 

प्रसिद्ध उद्योगपती स्व. रसिकलाल धारिवाल यांच्या जयंती निमित्त शिरूर येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे

 

 

प्रकाशभाऊ धारिवात मित्र मंडळाच्या वतीने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून जागतिक कीर्तीचे उद्योजक आणि शिरूरचे मा नगराध्यक्ष स्व रसिकलाल धारिवाल यांच्या ८७व्या जन्मजयंती सालाबाद प्रमाणे निमित्त शिरूर येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

स्व. रसिकलाल धारिवाल यांचे शिरूर शहराच्या योगदानात मोलाचा वाटा होता. अनेक धार्मिक शैक्षणिक वैद्याकिय क्षेत्रात त्यांचे कार्य हे उल्लेखनीय होते त्यांच्या जयंती निमित्त दरवर्षी पी.आर. धारिवाल फाऊंडेशन संचलित व प्रकाशभाऊ धारीवाल मित्र मंडळाच्या वतीने शिरूर येथे महारक्तदान शिबिर आयोजित करत आले आहे. गतवर्षी या शिबिरामध्ये तब्बल सर्वाधिक १५०० रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून विक्रमी टप्पा पूर्ण केला होता.

यावर्षी देखील रविवार दी २९ मार्च २०२६ रोजी येथील नगरपरिषद मंगल कार्यालय येथे सकाळी ७ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. तसेच पर्यावरणाचा समतोल राखावा या सामाजिक भावनेतून सर्व सहभागी रक्तदात्यांमधून लकी ड्रॉ पद्धतीने ८७ रक्तदात्यांना सायकलींचे वाटप करण्यात येणार असल्याचे आयोजकानी यावेळी सांगितले. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबीरात सहभाग नोंदवावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

 

याबाबत रक्तदात्यानी नाव नोंदणी व इतर अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक ९८८१२१४४९१, ९८८११७८७६०, ९८२२२८१४११, ९८२२५३१५१५, ९०४९२०२१२१ या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button