राजकीय

शिरूर हवेली मतदारसंघातील राजकारणातील धुरंदर कोण ❓

शिरूर प्रतिनिधी

सध्या देशात धुरंदर 2हा चित्रपटगाजत असून या चित्रपटाच्या माध्यमातून राजकीय पटलावर सध्या कोण धुरंदर होणार अशी चर्चा शिरूर तालुका असून शिरूर तालुक्याच्या राजकीय पाटलावर सध्या धुरंदर होऊन बाजी कोण मारणार हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे

 

 

शिरूर तालुक्याच्या राजकारणातील सध्या सर्वात मोठा ट्विस्ट असून शिरूर तालुक्यातील राजकारणावर मध्ये स्वर्गीय माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे वर्चस्व होते तर माजी आमदार अशोक पवार हे सुद्धा दोन वेळा आमदार तसेच घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून त्यांनी पद भूषविलेली आहे.

 

 

मात्र शिरूर तालुक्यातील अनेक संस्थांवर अशोक पवार यांचे वर्चस्व असताना 2023 मध्ये राष्ट्रवादीची जी फूट पडली त्यावेळेस तत्कालीन आमदार अशोक पवार हे शरद पवार यांच्याबरोबर त्यांनी राहणे पसंत केले तर तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांनी महायुतीकडे झेप घेत त्यांच्याबरोबर आणि जाणे पसंत केल्याने तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी अशोक पवार यांचे साथ सोडत अजित पवार यांच्यावर जाणे पसंत केले त्यामुळे भविष्यातील राजकारणाची दिशा बदलल्याने शिरूर तालुक्यातील 2024 च्या झालेल्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अशोक पवार तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्यात लढत झाली व या लढतीमध्ये ज्ञानेश्वर कटके यांनी अशोक पवार यांचा 70000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केल्याने शिरूर हवेली मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालट झाली.
दरम्यानच्या काळात राज्यात महायुतीचे सरकार आल्याने आमदार ज्ञानेश्वरउर्फ माऊली कटके यांना चांगल्या प्रकारे निधी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याने शिरूर हवेली मतदारसंघात ज्ञानेश्वर माऊली कटके यांची दमदार सुरुवात झाली तर दुसरीकडे माजी आमदार अशोक पवार यांना परभावानंतर काहीसे बॅकफूटवर जावे लागले त्यामुळे घोडगंगा कारखाना हा निवडणुकीचा मुद्दा असल्याने घोडगंगा कारखाना कधी चालू होणार याबाबत सुद्धा चर्चा सुरू झाली.

 

 

विधानसभेच्या निवडणुकीनंतर सर्वात महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका खूप वर्षांनी पार पडल्या त्यात शिरूर नगर परिषदेची निवडणूक व जिल्हा परिषद पंचायत समिती या दोन्ही निवडणुकीत प्रथम झालेल्या शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढल्या त्या निवडणुकीमध्ये आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके व माजी आमदार अशोक पवार यांच्यात अनेक मतदान केंद्रावर तुतू मै मै झाली यात आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके यांनी सात नगरसेवकासह नगराध्यक्ष पद हे राष्ट्रवादीकडे खेचून आणले शिरूर शहरातील राष्ट्रवादी ची ताकद त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिली विधानसभेनंतर एक वर्षानंतर बरोबर झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मिळालेल्या घवघवीत यशा मुळे त आमदार कटके यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. माजी आमदार अशोक पवार यांच्या राष्ट्रवादीला पाच नगरसेवक निवडून आणण्यात यश मिळाले तर भारतीय जनता पार्टीला 11 नगरसेवक निवडून आणण्याचे यश मिळाले.

 

महत्वाची निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेतील म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती शिरूर तालुक्यातील या महत्त्वाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा त्यावेळेस सुरू होती त्यामुळे पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हे दोन्ही मिळून निवडणूक लढवणार असे ठरले नंतर घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचे ठरले त्यामुळे शिरूर तालुक्यात माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार यांना मांडवगण फराटा गटातून उमेदवारी मिळत त्या घड्याळ चिन्हावर उभे राहिल्या

 

 

मात्र त्यांच्या विरोधात मात्र त्यांच्या विरोधात आमदार कटके यांची समर्थक दादा पाटील फराटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत पवार यांच्यापुढे आव्हान उभे केले व आमदार कटके यांनी दादा पाटील यांचा प्रचार करत सरळ सरळ अशोक पवार यांना विरोध केला मात्र अशोक पवार यांनी या ठिकाणी आपला गड राखत सुजाता पवार या 6000 पेक्षा जास्त मतांनी निवडून आल्या आणि अशोक पवार यांनी आपले या गटातील वर्चस्व सिद्ध केले मात्र तालुक्यातील जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीने आपले चार उमेदवार निवडून आल्याने आमदार कटके यांनी पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेत आपले वर्चस्व सिद्ध केले तालुक्यातील महत्त्वाचे असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे आठ उमेदवार निवडून आणत पंचायत समितीचे सभापती राष्ट्रवादीचे स्वाती घावटे केल्याने आमदार कटके यांनी पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध करत समिती आपल्या ताब्यात मिळवण्यात यश मिळवले तर मांडवगण गटातून दोन्ही पंचायत समिती गणातून सदस्य निवडून आणत माजी आमदार अशोक पवार यांनी आपल्या गटावरचे वर्चस्व कायम ठेवले

 

 

झालेल्या निवडणुकीत आजी-माजी आमदारांनी समोरासमोर लढत दिली व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या शिरूर तालुक्यात आमदार कटके यांनी राजकीय वजन वापरत सर्व संस्था आपल्या ताब्यात ठेवण्यात त्यांना यश आले आगामी काळात बाजार समिती ही निवडणूक ही बाकी असून आमदार कटके बाजार समिती या निवडणुकीत काय भूमिका घेतात याकडे सुद्धा पाहणे महत्वाचे असून धुरंदर चित्रपट प्रमाणे तालुक्यातील राजकीय पटलावर या दोघांमध्ये धुरंदर कोण ठरले याबाबत चर्चा सुरू आहे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button