राजकीयशिरूर तालुका

शिरूर शहरात बहुमजली पार्किंगसाठी शासनाने भूखंड हस्तांतरित करावा – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके

शिरूर प्रतिनिधी

शिरूर शहरात पारनेर श्रीगोंदा शिरूर तालुका यांची मोठी बाजारपेठ असून या बाजारपेठेमुळे बँका दुकाने तसेच दैनंदिन कामानिमित्त नागरिक शिरूर शहरात येत असतात व आपली वाहने पार्किंग करत असतात त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पार्किंगची मोठी समस्या असून त्यासाठी सी टी सर्वे गट क्रमांक 2015 भूखंड नगरपरिषदेस हस्तांतरीत करून बहू मजली पार्किंग सुविधा उभारावी अशी मागणी शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी विधानसभेत लक्षवेधी केली.

 

याबाबत दिनांक 24 रोजी आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी विधानसभेत लक्षवेधी करताना ही मागणी केली याबाबत कटके यांनी सांगितले की शिरूर शहरात दैनंदिन कामासाठी नागरिक येत असतात व अनेक धार्मिक कार्यक्रमामुळे मिरवणुका निघत असतात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या नागरिकांमुळे अरुंद रस्ते तसेच गावठाण भागात पार्किंग साठी सुविधा व कुठेही जागा आरक्षित नसल्याने नागरिकांना रोज पार्किंगच्या समस्येला तोंड द्यावे लागत असून अरुंद रस्त्यावर वाहणे उभे केल्याने वाहतूक कोंडीची समस्या होऊन अपघात होत असतात म्हणून मंजूर विकास आराखड्याप्रमाणे शिरूर नगरपरिषद हद्दीतील राखीव असलेला सी टी सर्वे गट क्रमांक 2015 भूखंड नगरपरिषदेस हस्तांतरितकरून बहू मजली पार्किंग व्यवस्था शिरूर नगरपरिषद मार्फत करता येईल त्यामुळे सिटीसर्वे नंबर 2015 हा भूखंड शासनाने नगर परिषदेस हस्तांतरीत करावा अशी मागणी आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी विधानसभेत केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button