शिरूर तालुकासामाजिक

गाईवर अंत्यसंस्कार करत नगरसेवकाने घडवले माणुसकीचे दर्शन

शिरूर प्रतिनिधी

शिरूर शहरात दिनांक 23 रोजी एक माणुसकीचे दर्शन घडले शिरूर शहरातील भाजपचे नगरसेवक सागर त्रिंबक नरवडे यांनी हे माणुसकीचे दर्शन घडवत आपले नगरसेवक पदाची कर्तव्य पार पाडत एका मुक्या प्राण्याला निरोप देत आपले कर्तव्य बजावले

या बाबत माहिती पुढील प्रमाणे शिरूर शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील भाजपचे नगरसेवक सागर नरवडे यांचा प्रभाग असलेल्या सात मधील करंजुले वस्ती येथे एक गाई मृत अवस्थेत आढळली त्यानंतर तेथील नागरिकांनी सागर नरवडे यांना या मृत गायी बद्दल कळविले सागर नरवडे यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, स्वच्छता सभापती,स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय बर्गे यांना फोन करून सर्व हकीकत सांगितले त्यानंतर त्या ठिकाणी सर्व नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी हजर होऊन त्या मृत गाईचे करायचे काय अशी चर्चा सुरू असताना सागर नरवडे यांनी या गाईला हिंदू शास्त्राप्रमाणे अंत्यसंस्कार करावे असे सूचना केली तसेच स्वतः या गाईचे पांजरपोळ या ठिकाणी अंत्यसंस्कार केले त्यामुळे सागर नरवडे यांच्या माध्यमातून माणुसकीचे दर्शन घडले

 

आजच्या परिस्थितीत कोणी कोणाला विचारत नसताना मुक्या प्राण्याला न्याय देण्याचे काम केले की याबाबत नरवडे यांनी सांगितले की आमच्या प्रभागातील करंजुले वस्ती येथील काही नागरिकांचा मला फोन आल्यानंतर त्या ठिकाणी मृत अवस्थेत असलेल्या गाईला कोठे नेऊ शकत नसल्याने त्यामुळे तिच्यावर हिंदू धर्म शास्त्र पद्धतीने अंत्यसंस्कार केले हिंदू शास्त्रात गायी गोमाता असून त्यामुळे त्याचा विधीला सहकार्य करणे ही गरज असल्याचे ओळखून मी ते काम पूर्ण केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button