गुन्हेगारीशिरूर तालुका

तालुक्यात फायरिंग सारख्या घटना होऊन सुद्धा माहिती देण्यास टाळाटाळ

शिरूर प्रतिनिधी

 

मोठी घटना घडून होऊन सुद्धा माहिती देण्यास शिरूर पोलीस स्टेशन कडून टाळाटाळ होत असल्याने या घटनेचे गांभीर्य शिरूर पोलीस स्टेशनला नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्या असून घटनेची माहिती जर प्रसार माध्यमांना मिळत नसेल तर यामागे काहीतरी मोठे गोड बंगाल असल्याची चर्चा शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे.

 

 

शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत न्हावरा टाकळी हाजी
मांडवगण फराटा हे आऊट पोस्ट कुठली घटना घडल्यास त्याचे गांभीर्य शिरूर पोलीस स्टेशनला असणे गरजेचे आहे दिनांक 19 रोजी सायंकाळी मांडवगण फराटा येथे गोळीबाराचा प्रकार घडला मात्र शिरूर पोलीस स्टेशनचे अधिकारी या घटनेची माहिती देण्यास टाळाटाळ करत होते दिनांक 20 रोजी सायंकाळी नऊ वाजता ही या घटनेची नोंद व माहिती प्रसार माध्यमांना न देता उडवा उडवी ची उत्तरे मिळाली नेमकं या घटने संदर्भात शिरूर पोलीस स्टेशन गांभीर्याने घेतले आहे की नाही याबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू असून शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक घटना रोज घडत आहे मात्र याकडे शिरूर पोलीस अजिबात गांभीर्याने पाहत नाही शिरूर शहरात रोड रोमिओ यांनी उच्छाद मांडलेला आहे तसेच जवळपास 50 च्या वर गाड्या या काळ्या काचा असून संपूर्ण शिरूर शहरात दिवसभर फिरत असतात असलेल्या गाडीतून गुन्हेगार किंवा शस्त्र आहे का याबाबत सुद्धा नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण असून याबाबत नागरिकांनी शिरूर शहरात सुद्धा भीती व्यक्त केली आहे .

 

 

अवैध धंदे जोरात सुरु असून अनेक गोष्टी छोट्या-मोठ्या चोऱ्या सोन्याच्या चैन चोरा चोरणे मंगळसूत्र चोरणे अनेक या गोष्टी घडत असताना सुद्धा शिरूर पोलीस स्टेशन ने याबाबत कुठली ठोस उपाययोजना केलेली दिसत नाही घटनेचे गांभीर लक्षात घेणे गरजेचे असताना हा अधिकारी त्या अधिकाऱ्यावर ढकलतो तो अधिकार त्या अधिकार्‍यावर ढकलतो आणि माहिती देण्यास टाळाटाळ करतात माहिती न देण्यामागे काय आर्थिक तडजोड आहे का हे सुद्धा पहाणे गरजेचे आहे कारण 24 तास होऊन सुद्धा जर गुन्हा ची माहिती प्रसार माध्यमांना दिली जात नसेल तर यामागे मोठे षडयंत्र असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

 

 

चौकट
गुन्हे प्रगटीकरण शाखा सध्या काय करत आहे हा प्रश्न शिरूर शहरातील नागरिक विचारत आहे गुन्हे प्रगटी करन शाखा ही शिरूर पोलीस स्टेशन मधली अंतर्गत हे गुन्हेगारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक टीम तयार केलेली आहे मात्र हे गुन्हे प्रगटीकरण शाखा सध्या काहीच करत नसून गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळण्याचे लांबच राहिले मात्र गुन्ह्याची माहिती देण्यास सुद्धा या शाखेंकडून असमर्थाचा दर्शविली गेली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button