Uncategorized
शिरूर पोलीसानकडुन विद्युत पंप चोरी करणारे जेरबंद
शिरूर ama९ वृत्तसेवा
शिरूर तालुक्यातील बेट भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विद्युत पंप चोरीचा छडा लावण्यात अखेर शिरूर पोलिसांना यश आले असून पोलिसांनी चार आरोपी अटक केले असून चोरीचे १७ कृषी पंप जप्त करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शिरूर तालुक्याच्या बेट भागात गेल्या काही दिवसांपासून चोरीचे सत्र सुरू होते.या भागात पावसाळा असूनही शेतकऱ्यांची कृषी पंप चोरीला जाण्याचे प्रकार वाढले होते.या चोरीला आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती.त्या अनुषंगाने शिरूर पोलिस तपास करत होते.
त्या अनुषंगाने तपास करत असताना पोलिसांनी पांडुरग शिवाजी बोडरे (वय २० वर्षे रा. रावडेवाडी ता. शिरूर), कुलदिप उर्फ मोन्या बबन बोडरे (वय २० वर्षे),अजर हुसेन खान (वय २२ वर्षे रा. सिन्नर नाशिक),अख्तर उर्फ कुल हुसेन खान (वय २७ वर्षे रा. अहमदाबाद फाटा)भंगार व्यवसायीक यांना अटक करण्यात आलेली आहे.
आरोपींकडून एकूण चोरीचे १७ कृषी पंप, गुन्हाकरण्यासाठी वापरत असलेली एक दुचाकी व चारचाकी वाहन असा माल हस्तगत करण्यात आलेला आहे.आरोपींकडून एकुण १० गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.
हा तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक सुनिल उगले,पोलिस नाईक धनजंय थेउरकर, सहायक फौजदार नजिम पठाण,पोलिस कॉन्स्टेबल सुरेश नागलोत, विशाल पालवे, दिपक पवार, राजेंद्र गोपाळे, विनोद काळे होमगार्ड आकाश येवले व बिपीन खामकर या पथकाने केलेली आहे.

