Uncategorized

निवडणुका स्थगित केल्याने इच्छुक उमेदवारान मध्ये नाराजी

शिरूर ama९ वृत्तसेवा राज्यातील नगरपरिषद,जिल्हा परिषद,पंचायत समिती व सहकारी संस्थांच्या निवडणुकाना स्थगिती देऊन पुढे ढकलल्याने इच्छुकांचे मनसुबे उधळले गेले असून काहीसे राजकीय क्षेत्रात नैराश्याचे वातावरण तयार झाले आहे.

राज्यातील सहकारी संस्था,जिल्हा परिषद पंचायत समिती,नगरपरिषद आदी संस्थांची मुदत संपली असून गेल्या दोन वर्षांतील कोरोना काळा मुळे तसेच ओबीसी आरक्षण मुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.मात्र कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर सर्वांना निवडणुकीचे वेध लागले होते.राज्य निवडणूक आयोगाने अनेक नगरपरिषद व सहकारी संस्था यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम ही जाहीर केला होता.या कार्यक्रमानंतर इच्छुकांनी या निवडणुका लढविण्यासाठी कंबर कसली होती.त्या दृष्टीने तयारी देखील सुरू केली होती.आपल्याला उमेदवारी मिळावी या साठी इच्छुकांनी वरिष्ठ पदाधिकऱ्यांची मनधरणी सुरू केली होती.या निवडणुकी च्या माध्यमातून सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागल्या होत्या.मात्र निवडणुका स्थगित झाल्याने सर्वांच्या आशेवर पाणी फेरले गेले.

या निवडणुकीसाठी काही पक्षांनी बैठका घेऊन मोर्चे बांधणी करत संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली होती.तर अनेक इच्छुक उमेदवारांनी आपल्या वार्ड(गण/गट) यावर आपली उमेदवारीची जाहिरात सुरू केली होती.मात्र सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित झाल्याने राजकीय हालचाली थंडावल्या असून इच्छुक उमेदवार हे प्रचंड त्रस्त झाले असल्याचे पहावयास मिळत आहे.अनेकांनी थेट नाराजी व्यक्त करत निवडणुका जाहीर करण्याची घाई का केली असा सवाल करत सर्व शासकीय यंत्रणा,मतदार याद्या,वॉर्ड रचना,मतदान केंद्र, हरकती यामध्ये गुंतल्या गेल्याने त्यांनी केलेल्या सर्व कामावर पाणी फिरले गेले असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.तर इच्छुक उमेदवारांनी खर्च करून प्रचारयंत्रणा सुरू केली होती.अनेक कार्यक्रम घ्यायला चालू केले होते.मात्र या घोषणेमुळे सर्व आर्थिक खर्च वाया गेल्याची भावना इच्छुकांनी व्यक्त केली आहे.

नुकतीच गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने इच्छुक उमेदवारांनी आपल्याला कशी उमेदवारी मिळेल यसाठी पक्षातील प्रमुखांचे स्टेटस ठेवत हेच आपले खरे गुरू असे भासवत होते मात्र या घोषणेमुळे यावर सुद्धा पाणी फिरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या निवडणुकीच्या माध्यमातून सोशल मीडिया, बॅनर,फ्लेक्स ,जाहिराती,झेंडे रिक्षा,मंडपवाले, आदीसह अनेकजणांना रोजगार मिळवून देणारी ही निवडणूक तसेच करोडो रुपयांची आर्थिक उलाढाल ही निवडणुकीच्या माध्यमातून होत असते.मात्र निवडणुकीला स्थगिती दिल्याने ही उलाढाल पूर्णपणे थांबणार आहे.त्यामुळे बाजारपेठेत थोडी शांतता पसरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button