Uncategorized

तोच जल्लोष,तोच आत्मविश्वास,तेच शिवसेनेवरील प्रेम ,तोच तीस वर्षापूर्वीचा कार्यकर्ता

शिरूर ama9

जय भवानी जय शिवाजी ,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो ,उध्दव ठाकरे अंगार है बाकी सब …… अशा अनेक घोषणानी शिरूर शहर दुमदुमून गेले .
तोच जल्लोष,तोच आत्मविश्वास,तेच शिवसेनेवरील प्रेम ,तोच तीस वर्षापूर्वीचा कार्यकर्ता केवळ शिवसेनेवरील असलेल्या निष्ठे पोटी शहरात जमा झाला होता . निमित्त ना कुठली निवडणुक ,ना कुठला कार्यक्रम शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेनेतील निष्ठावंत कार्यकर्त्यांनचा मेळावा आयोजित करण्यात आला होता .

गेल्या अनेक वर्षापासुन दबला गेलेला आवाज आज पुन्हा बाहेर आला गेल्या दहा वर्षापासुन शिरूर लोकसभेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे एक वेळा खेड तर दोन वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघातुन आढळराव निवडुन आले होते . मात्र शिंदे गटात ते गेल्या नंतरही शिरूर तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिक हे उध्दव ठाकरे यांच्या बरोबर राहिल्याचे चित्र या मेळाव्यात दिसले .

या मेळाव्याच्या निमित्ताने शहरात रॅली काढण्यात आली . सर्व जुने शिवसैनिक पुन्हा अनेक वर्षानी एकत्र आले . अनेकांनी आपल्यावर कसा अन्याय झाला तसेच कसा अन्याय केला याचे कथन केले . या वेळी अनेक पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या भावना तळतळीने व्यकत केल्या .
या वेळी शिरूर आंबेगाव तालुक्यात शिवसेना वाढू दिली नाहीं अनेक पदाधिकारी यांच्या विरोधात कट कारस्थाने केली.त्यांना शिवसेना विरोधात असल्याचे वरिष्ठांना सांगून त्यांचा विरोधात राजकारण केले असल्याचे आरोप आढळराव यांचे नाव न घेता शिरूरआंबेगाव ३९ गावचे तालुका प्रमुख गणेश जामदार यांनी केला.
नेते कुठे गेले यापेक्षा शिवसैनिक सर्वसमान्य नागरीक मतदार शिवसेना पक्ष बरोबर असल्याचे शिवसेना नेत्या जयश्री पलांडे यांनी सांगून, शिवसेना नव्या दमाने उभी रहाणार आहे गेले ते गद्दार पण खरा निष्ठावान शिसैनिक पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे बरोबर असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र गदादे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . त्यांनी सुध्दा तीव्र भावना या वेळी व्यक्त केल्या .

गेल्या काही वर्षापासुन शिवसेने पासुन दुर गेलेले शिवसेनेचे माजी शहरप्रमुख व नगरसेवक मंगेश खांडरे यांनी सुध्दा या मेळाव्याला हजेरी लावत आपले अनुभव या वेळी सांगितले .
या मेळाव्याच्या निमित्ताने शिरूर तालुका शिवसेनाला कुठलाही फटका बसला नसल्याचे दिसुन आले . सर्व निवडणुका ताकतीने व स्वबळावर लढविण्याचे ठरवण्यात आले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button