Uncategorized

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रम

शिरूर ama9
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक यांच्या घरातील व्यक्तिंचा सन्मान तर शिरूर शहरात 8 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान शहरातील साडेआठ हजार घरांवर घर घर तिरंगा अंतर्गत तिरंगा ध्वज फडकणार असल्याचे शिरूर नगरपरिषद मुख्याधिकारी ॲड .प्रसाद बोरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले


हे सर्व कार्यक्रम शिरूरचे प्रांत अधिकारी व प्रशासक संतोषकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शकाखाली होणार असल्याचे बोरकर यांनी सांगितले.

या वेळी
शिरूर नगरपरिषद कक्ष अधिकारी आयुब सय्यद, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियांता राजश्री मोरे ,स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे संगणक अभियंता सचिन सुडके कर विभाग प्रमुख रामचंद्र नरवडे उपस्थित होते.
तर या कार्यक्रमांमध्ये विविध स्पर्धा, रॅली, व्याख्याने, वृक्षारोपण या सारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून,शहरातील सर्व नागरिकांनी शासकीय कर्मचारी अधिकारी यांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. स्पर्धा वेळ ठिकाण याबाबत नगरपरिषद पत्रके वाटून सांगणार आहे.
शिरूर शहरातील कान्हु गोविंद धुमाळ व मीरादेवी दामोदरदास मुंदडा (सारडा) या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा घरी जाऊन सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.
तर शिरूर शहरातील नगरपरिषद प्राथमिक शाळेतीलएक हजार सहा विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शालेय गणवेश ,स्पोर्ट गणवेश, साहित्य आय कार्ड यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे बोरकर यांनी या वेळी सांगितले .
.आठ ऑगस्ट रोजी शहरातील नगरपरिषद या ठिकाणी राष्ट्रीय ध्वज विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार असून तेथून नागरिकांनी घ्यावा . तसेच स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेले स्वातंत्र्यसैनिक व कारावास भोगाव लागणारे स्वातंत्र्य सैनिक यांच्या घरी भेट देणार तर रयत शिक्षण वृक्षारोपण कार्यक्रम तर 9 ऑगस्ट क्रांती दिना निमित्त रोजी सकाळी अकरा वाजता एकाच वेळी समूह राष्ट्रगीत गायन करण्यात येणार आहे.
१० ऑगस्ट रोजी विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महिला बचत गट यांना मार्गदर्शनही यावेळी करण्यात येणार आहे.११ ऑगस्ट रोजी शहर व राष्ट्राचा इतिहास याबाबत प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली असून विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हाव. 12 ऑगस्ट रोजी किशोरी मेळावे आयोजित करण्यात आले असून अंगणवाडीचे व मदतनीस, आशा वर्कर शाळा व महाविद्यालयातील शिक्षका वैद्यकीय अधिकारी अथवा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ यांच्या सहभागातून योग्य व सकस आहार बालविवाहाचे दुष्परिणाम याबाबत व्याख्यान होणार आहे. तसेच देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा, 13 ऑगस्ट रोजी गोपाळांची पंगत या बाबीतून शहरातील दानशूर व्यक्तिमार्फत अंगणवाडीतील बालकांना सलग सात दिवस फळांची पंगत व इतर शाळेमध्ये अन्नधान्य वाटप करण्यात येणार आहे.
14 ऑगस्ट रोजी पर्यावरण संवर्धन शपथ 15 ऑगस्ट रोजी शहरातून प्रभात फेरी काढण्यात येणार आहे तसेच शालेय स्पर्धा व प्रदर्शनी यावेळी घेण्यात येणार आहे. सिद्धीचा पाड येथे स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृत महोत्सवानिमित्त 75 पिंपळाची झाडे लावण्यात येणार आहे.
16 ऑगस्ट रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 17 ऑगस्ट रोजी मोबाईल दुष्परिणाम व मार्गदर्शन व चर्चा तर स्वराज्य महोत्सव सांगता समारंभ स्वराज्य फेरी देशभक्तीपर चित्रपट दाखवण्यात येणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शिरूर नगर परिषदेने विविध कार्यक्रमाचे स्पर्धा आयोजन शहरातील शालेय विद्यार्थी नागरिक विविध कलाकार महिला गृहणी यांनी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन शिरूर नगरपरिषद मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांनी सांगितले
फोटो स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याचा बॅच लावताना मुख्याधिकारी ॲड . प्रसाद बोरकर


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button