Uncategorized
पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना भारत सरकारच्या गृह विभागाकडुन “केंद्रीय गृहमंत्री पदक"जाहीर
शिरूर ama9 वृत्तसेवा
शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना
भारत सरकारच्या गृह विभागाकडुन उत्कृष्ट तपसाकरीता “केंद्रीय गृहमंत्री पदक” सन २०२२ पुणे ग्रामीण पोलीस दल जाहीर झाला असुन त्यांच्या या निवडीमुळे त्यांचे शिरूर शहरातुन अभिनंदन होत आहे.
केंद्र शासनाने या संदर्भात दिनांक १२ रोजी जाहीर केलेल्या परिपत्रकात देशातील अनेक अधिकाऱ्यांनची नावे असुन . पुणे ग्रामीण दलातुन तीन अधिकाऱ्यांनची निवड करण्यात आली आहे . यात शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांचा समावेश आहे . सुरेशकुमार राऊत हे गेली सत्तावीस वर्ष पोलीस दलात असुन पोलीस उपनिरिक्षक म्हणून त्यांनी सेवेला सुरुवात केली .मुंबई,पुणे शहर, वाशीम,पुणे ग्रामीण आदी ठिकाणी त्यांनी आपला पोलीस दलातील सेवा दिली . गेल्या एक वर्षापासुन शिरूरला प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणुन काम पहात आहे .
पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत हे शिरूर येथे प्रभारी अधिकारी असतांना शिरूर पो.स्टे. गु.र.नं.८१६/२०२१, भा.द.वि. कलम ३९५ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) गुन्हा दाखल होता. या गुन्हयामध्ये आरोपींनी बॅक ऑफ महाराष्ट्र, पिंपरखेड ता. शिरूर या ठिकाणी बँकेचे कर्मचारी व हजर ग्राहकांना पिस्तुलाचा धाक दाखवुन एकुण ८२४ तोळे साने चांदीचे दागिने व ३२,५२,५६० रोख रक्कम रूपये असा ऐवज लुटुन नेला होता. हा गुन्हा उघड करण्याच्या दृष्टीने पुणे ग्रामीण पोलीस दलासमोर आव्हान होते. सदर गुन्हयाचा शिरूर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा यांनी समांतर तपास करून आठ दिवसात 2 कोटी ३६ लाख ४२ हजार ९६० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन आरोपींना जेरबंद केले होते . बॅकेत गहाण ठेवलेले कष्टाचे सोने शिरूर पोलिसांनमुळे परत मिळाले यामुळे नागरिकांन च्या चेहऱ्यावर आनंद दिसला व पोलिसांनचे आभार मानले . या कामगिरी मुळे हा पुरस्कार मिळाला आहे .


