Uncategorized
एका संघर्षपर्वाची सांगता ,लोकनेते,आपला माणुस कै . बाबुराव पाचर्णे साहेब
शिरूर ama९ वृत्तसेवा
एका संघर्षपर्वाची सांगता .
पुणे जिल्हाच्या राजकिय पटलावर मागील ५ दशकाहून आधीक काळ आपल्या राजकारणाची अमीट छाप सोडणार व्यक्तिमत्व म्हणजे लोकनेते माजी आमदार बाबूराव पाचर्णे .
पाचर्णे यांच्या सर्वच पक्षीय कार्यकर्त्याशी व सामान्य जनतेशी थेट संबंध जोडल्या गेलेले पाचर्णे याची जनसामान्यात ‘आपला माणूस ‘ अशी ओळख होती .
प्रस्थापित सत्ताधारी पुढे विविध निवडणूकीत त्यांनी आव्हान उभे केले होते. विरोधकाना एकत्रित आणत सर्वाना बरोबर घेत त्यांनी सत्ताधारी वर्गाच्या विरोधात संघर्ष करत राजकारण केले .
एका शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या व कोणतीही राजकिय पार्श्वभूमी नसताना त्याची बहरत गेलेली राजकीय कार्यकिर्द अनेकांना प्रेरणा देणारी आहे.वडील काशीनाथ हे शेतकरी तर बाबूराव पाचर्णे सह ४ मुले व ५ मुली असे मोठे कुटुंब पाचर्णे यांचे होते . लहानपणापासूनच पाचर्णे यांना माणसे जोडण्याचा छंद होता .
सलग सहा विधानसभा निवडणूका लढविणारे शिरुर विधानसभा मतदारसंघाचे ते एकमेव व्यक्तिमत्व होते. आपला जनसंपर्क लोकप्रियता व करिश्मा , नातेगोते यांच्या जोरावर शिरुर विधानसभा मतदारसंघात त्यांना माननारा एक स्वतंत्र मतदार होता. अंदाजे ४० हजार हून आधिक मतदाराची हक्कांची व्होटबॅक पाचर्णे यांची स्वंत : ची होती त्या व्होटबॅकेस बीकेपी ( बाबूराव काशीनाथ पाचर्णे )असे म्हटले जाते. सलग सहा विधानसभा निवडणूका त्यांनी लढविल्या . कॉग्रेस आय , अपक्ष भाजप अश्या निवडणूका त्यांनी लढविल्या त्यात ४ पराभव तर २ विजय त्यांनी मिळविले होते .सन १९९५ ला विधानसभा निवडणूकीत अवघ्या ६७८ मतानी ते पराभूत झाले . पराभवाच्या निकाला नंतर दुसराच दिवशी एका दशक्रिया विधीला त्यांनी हजेरी लावत सर्वसामान्य जनतेच्या सुख दु :खात ते सक्रिय सहभागी झाले .
तालुक्यात मोठी सत्तास्थाने ताब्यात नसताना ही अनेक कार्यकर्त्यांना आपल्या कामातून पाठीशी उभे करण्याचे अजब कौशल्य त्याच्या कडे होते . राजकारणात आपले सर्वस्व पणाला लावुन परभवा नंतर हि न थाबणारा नेता म्हणून त्यांची ओळख कायम राहिल .
शिरुर गृप ग्रामपंचायत सदस्या पासून राजकीय कार्यकिर्द सुरु झाली त्यानंतर शिरुर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती , पंचायत समिती सदस्य ,जिल्हा परिषद सदस्य , घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक , कारखान्याचे उपाध्यक्ष आमदार अशी पदे त्यांनी भूषविली .
पुणे जिल्ह्यात मातब्बर राजकिय ताकदीपुढे पाचर्णे यांनी केलेला संघर्ष हा महत्वाचा मानला जातो .
अनेक जणांच्या राजकिय कार्यकिर्द त्यांनी घडविल्या होत्या .लोकशाहीत निवडणूक या लोकशिक्षणासाठी असतात पराभूत झाले तरी नाउमेद होवू नका लोकांशी संपर्क कायम ठेवा ,त्याची कामे मार्गी लावा यश तुम्हाला नक्की मिळेल असे ते कार्यकर्त्या नेहमी सांगत .
एकीकडे राजकारण करित असताना शेती कडे त्यांनी कधी दुर्लक्ष केले नाही लोकांच्यात आणि रानातील मातीत ते आधीक रमत ते प्रयोगशील शेतकरी होते शेतीत विविध प्रयोग करत विशेषत : सेंद्रिय शेतीसाठी त्याच्या आग्रह असायचा आग्रहच नव्हे तर त्यांनी स्वंत त्याच्या चव्हाणवाडी येथील शेतावर सेंद्रिय शेती फुलविली होती सेंद्रिय शेती बरोबरच जुन्या पध्दतीचा वाडा राहण्यासाठी बांधला होता त्याच बरोबर सेंद्रीय गुळ निर्मिती प्रकल्प व गावरान गायीचा दुधाचे उत्पादन याठिकाणी सुरु केले होते अनेक कार्यकर्त्याना हक्कांने हा सेंद्रिय गुळ व गावरान गायीचे तुप देत असायचे .त्याच बरोबर शेतीला पूरक व्यवसायाची जोड द्या असे ते नेहमी सांगत . त्यांनी स्वतं: च्या तर्डोबाचीवाडी या गावातील शेतावर शिवतारा नावाचे कृषि पर्यटन केंद्र काढले .आदरातिथ्य ,मानसन्मान कश्या करावा हे साहेबांकडून शिकण्यासारखे होते.साहेब सर्वच कार्यकर्त्यांशी नम्रतेने वागत. साहेब कार्यकर्त्यांशी तर प्रेमाने वागत पण विरोधकांशी ही प्रेमाने . त्याच्यावर कितीही टीका झाली तरी ही विरोधकांवर टोकाची टीका केली नाही विरोधकांवर टीका करताना त्यांनी पातळी सोडली नाही व विरोधकांशी कटूताही ठेवली नाही .त्यामुळे पाचर्णे यांचे व्यक्तिमत्व राजकीय वर्तुळात अजातशत्रू म्हणून ओळखले जात .
सत्त्ता असो अथवा नसो पद असो वा नसो साहेबांच्या कडून कोणी कधीच रित्या हाताने परत आले नाही . पाचर्णे यांच्या व्यक्तिमत्वात आपल्या कामातून वागण्यातून बोलण्यातून माणसे , कार्यकर्ते खेचून घेण्याचे प्रभावित करण्याचे कौशल्य होते त्याच्या लोकसंग्रह हा अफाट होता .
साहेबाचे हास्य व पाठीवर टाकलेल्या हात अनेक कार्यकर्त्याना लढण्यासाठी बळ देत .कार्यकर्त्या लहान असो अथवा मोठा साहेब त्याच्या प्रत्येक सुख दु : खाचा प्रसंगी त्याच्या पाठीशी होत. लग्न सराईत विविध ठिकाणी अस णा – या कार्यकर्त्याच्या घरातील विवाहाना आवर्जून हजेरी लावत . अंत्यविधी व दशक्रिया विधीना ही ते उपस्थित राहात साहेब हे वन मॅन आर्मी होते .अनेक चढउतार व अपयशाना सामोरे जावुन ही ते कोण्यावर रागावले नाही की खचले नाहीत .उद्याचा दिवस आपलाच असेल असे कार्यकर्त्याना ते सांगत व कार्यकर्त्यान मध्ये लढण्यासाठी नवा जोष निर्माण करत .
समाजकारण राजकारण करित असताना साहेबानी आरोग्या संदर्भात ही काम केले. योगगुरू रामदेव महाराज यांना शिरुर येथे आणून योगा विषयीचे मोठे शिबीर त्यांनी घेतले . त्याच बरोबर नियमित पणे योगशिबीराचे आयोजनासाठी ही सहभाग घेतला त्याखेरीज अशोक हांडे यांच्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले होते मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी आखाड्याचे आयोजन असो स्पर्धा असो अथवा क्रिकेटच्या स्पर्धा पाचर्णे साहेबांनी यासाठी मदतीची भूमिका घेतली . अध्यायत्माविषयी साहेबाना विशेष ओढा होत्या . शिरुर पंचक्रोशीतील रामलिंग महाराज यात्रा व दर दोन वर्षानी येणाऱ्या तर्डोबावाडीच्या भैरवनाथमहाराज याच्या यात्रेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेत.विविध गावचे हरिनाम सप्ताह यात्रा , कीर्तन प्रवचय येथे ही पाचर्णे साहेब आवर्जून सहभाग घेत .
यापुढे शिरुर तालुक्याचा राजकारणात अनेक नेते येतील मोठे होतील पण आपला माणूस अशी जनतेच्या ह्र्द्यात प्रतिमा असणारा लोकनेता होणे अवघडच .
लोकनेते बाबुरावजी पाचर्णे म्हणजे आयुष्यभर संघर्षमय जीवन. पाच दशके शिरुरचे राजकारण पाचर्णे यांच्या भोवती केंद्रीत होते .निवडणूकीत हार जीत होवो ,कोणी काम केले न केले ,विरोधात गेले तरी कोण्याविषयी मनात रोष नाही अढी नाही कोठुन आणल्या होता साहेब एवढा सयंम आपण . अनेक जण यशाने उन्मत होतात व पराभवाने घायाळ होवून सूडाने पेटून उठतात तर तुम्ही हार जीत होवून ही स्थितप्रज्ञ खरच राजकारणात असूनही साहेब कस साधल आपण ह पावलो पावली संघर्ष करुनही चेहरावरील हास्य कधीच तुम्ही लोप पावू दिले नाही .
आयुष्यभर साहेबांनी गर्दी जमविली माणसांच्या गराड्यात साहेब असायचे पण साहेब गेले त्यादिवशी साहेब नसताना ही हजारोंची गर्दी झाली .सर्व धर्माची ,जातीची ,शहरी ग्रामीण अश्या सर्व स्तरातील लोक होती .ही सर्व लोक आपल्या लोकनेताला शेवटचा निरोप द्यायला आली होती साहेबांनी आयुष्यभर जतन केली होती ती माणूसकी प्रेम आदर या सर्वांचे दर्शन या गर्दीत होत होते साहेबांचे पार्थिव शरीर जरी अनंतात विलीन झाले तरी साहेबांचे कार्य व प्रतिमा या हजारो लोकांच्या स्मृतिपटलावर कायमचा कोरल्या गेल्या आहेत .
लोकनेते माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांना भावपूर्ण आदरांजली






