Uncategorized

शिरूर मध्ये सकल मराठा समाजाकडुन मेटे यांना श्रद्धांजली

शिरुर ama९ वृत्तसेवा

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे हीच खरी विनायक मेटे यांना श्रद्धांजली ठरेल अश्या शब्दांत शिरुर येथे आदरांजली वाहण्यात आली . शिरुर शहरातील शिरुर नगरपरिषद मंगल कार्यालयाजवळ शिवसंग्राम संघटनेचे नेते माजी आमदार विनायक मेटे यांचा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली अर्पण करण्यात आला.

यावेळी जनता द्लाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर , समस्त सकल मराठा संघ घोडनदीचे अध्यक्ष सतीश धुमाळ ,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद ,माजी पंचायत समिती सदस्य कानिफनाथ वाखारे , आखिल भारतीय मराठा महासंघाचे शहराध्यक्ष अनिल डांगे , किरण पठारे , भाजपाचे तालुका संघटक बाबूराव पाचंगे , योगेश महाजन , सागर नरवडे ,जयवंत साळुंखे , ॲड .रवींद्र खांडरे ,मराठा महासंघाचे माजी तालुकाध्यक्ष संभाजी कर्डिले शिरुर नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती तुकाराम खोले ,संतोष शितोळे,आदीनी श्रध्दांजली अर्पण केली . यावेळी माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे , राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष मुझफ्फर कुरेशी ,हाफिज बागवान ,रमेश दसगुडे, अविनाश जाधव ,रुपेश घाडगे , जयवंत साळुंखे , माजी नगरसेवक प्रवीण दसगुडे , आदी यावेळी उपस्थित होते . विनायक मेटे अमर रहेच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या . फोटो ओळी शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांना शिरुर येथे श्रध्दांजली वाहण्यात आली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button