Uncategorized

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत शिरूर मध्ये रॅली

शिरुर ama9 वृत्तसेवा 
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत ‘स्वराज्य महोत्सव’ व ‘हर घर तिरंगा या उपक्रमांअंतर्गतदिनांक:१२ ऑगस्ट रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे तसेच शिरूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामलिंग मोटर ड्रायव्हिंग स्कूल व इतर मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांच्या सहकार्याने शिरूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मोटर ड्रायव्हिंग स्कूल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .

“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत ‘स्वराज्य महोत्सव’ व ‘हर घर तिरंगा’ हे उपक्रम प्रभावी व यशस्वी पणे राबविण्याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे डॉ. अजित शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलिस स्टेशन शिरुर नगर परिषद, शिरूर , मार्फत श्रीरामलिंग मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालिका पुष्पक केवडकर यांनी रॅलीचे आयोजन केले .या रॅलीमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथीलअधिकारी सहभागी झाले होते .
या रॅलीमध्ये साधारण १५ अधिकाऱ्यांचा समावेश होता.
रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनांवर ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – ७५ वे वर्ष अश्या आशयाचे स्टिकर्स लावण्यात आले. तसेच देशभक्तीपर गीत लावून व पोस्टर्सच्या माध्यमातून नागरिकांमध्ये उपक्रमांविषयी जनजागृती केली. राजेंद्र पाटील, सहा.प्रा.प. अ., पुणे यांनी रॅलीचे नियोजन केले.
या रॅलीमध्ये साधारण १५ अधिकाऱ्यांचा समावेश होता.
रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनांवर ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – ७५ वे वर्ष अश्या आशयाचे स्टिकर्स लावण्यात आले. तसेच देशभक्तीपर गीत लावून व पोस्टर्सच्या माध्यमातून नागरिकांमध्ये उपक्रमांविषयी जनजागृती केली.
मोटार वाहन निरीक्षक, पुणे.
दत्तात्रय गाढवे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पुणे राजकुमार नरसगोंडे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, पुणे अक्षय मुसळे,
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, पुणे अमित पाटील, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, पुणे
गंगा जवळेकर, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक,पुणे अभिजीत कांबळे, शिरूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या आदेशानुसार पोलीस अधिकारी,
सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप यादव ,संदीप कांबळे ,पोलीस उपनिरिक्षक एकनाथ पाटील , सहाय्यक फौजदार गणेश देशमाने
गोपनीय पोलीस अंमलदार राजेंद्र गोपाळे ,शिरुर नगरपालिका मुख्यअधिकारी ॲड .प्रसाद बोरकर , पाणी पुरवठा अधिकारी राजश्री मोरे , स्वच्छता विभाग प्रमुख  दत्तात्रय बर्गे , तसेच सर्व नगरपालिका कर्मचारी वर्ग हे उपस्थित होते . 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button