Uncategorized
शिरूर बाजार समितीत मुग, सोयाबीन, बाजरी या शेतमालाचे आधारभुत खरेदी केंद्र सुरू करावे – ॲड.वसंतराव (काका) कोरेकर
शिरूर ama९ वृत्तसेवा मार्केटींग फेडरेशन किंवा नाफेड मार्फत मुख्ययार्ड शिरूर व उपबाजार तळेगांव ढमढेरे, पाबळ येथे आधारभुत किंमतीवर मुग, बाजरी व सोयाबीन या शेतमालांचे खरेदी केंद्र सुरू करणेचा प्रस्ताव शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तहसिलदार प्रशांत पिसाळ यांचेकडे दिला .
यावेळी सभापती ॲड. वसंतराव कोरेकर, उपसभापती प्रा.सतिष कोळपे सर, संचालक बंडु जाधव, सचिव अनिल ढोकले उपस्थित होते.
या बद्दल माहिती देताना सभापती ॲड कोरेकर यांनी सांगितले कि शिरूर तालुका व परिसरातील पारनेर, श्रीगोंदा, खेड, दौड तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी मुग, सोयाबीन व बाजरी, मका, तुर, व इतर कडधान्ये, भुईमूग या पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड/पेरणी केली असुन योग्य व पोषक पर्जन्यमान होणार असल्याने त्याचे उत्पादनही चांगल्या प्रमाणावर येईल असा अंदाज आहे. बाजार आवारात अधिकचे उत्पादन विक्रीसाठी आल्यास आधारभुत किमतीचे खाली बाजारभाव येण्याची शक्यता आहे.
जर जास्तीच्या व चांगल्या प्रतीच्या शेतमालाची मोठ्या प्रमाणावर यार्डवर आवक झाली तर शिरूर बाजार समितीमधील बाजारभाव आधारभुत किंमतीचे खाली येऊ नये म्हणुन बाजार समितीमार्फत योग्य ती दक्षता घेण्यात येणार आहे.
फोटो तहसीलदार यांना निवेदन देताना बाजार समितीचे पदाधिकारी

