Uncategorized

देशभक्ती पर समूह गीत स्पर्धेचे आयोजन हे कौतुकास्पद – आमदार ॲड अशोक पवार

शिरुर ama9 वृत्तसेवा
विद्यार्थ्यांन मध्ये राष्ट्रप्रेम , राष्ट्रभक्ती निर्माण करण्याचा दृष्टीने देशभक्ती पर समूह गीत स्पर्धेच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले हे कौतुकास्पद असल्याचे मत शिरूर हवेली चे आमदार ॲड . अशोक पवार यांनी व्यक्त केले .

स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या देशभक्तीपर समूहगीत कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता त्या वेळी ते बोलत होते .
या स्पर्धेत बालाजी विश्वविद्यालय शिरुर या शाळेचा प्रथम क्रमांक आला .
शिरुर नगरपरिषद ,महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शिरुर ,पसायदान संस्था व जायंटस क्लब यांच्या सयुंक्त विद्यमानाने बाबूराव नगर येथील डेक्कन स्कूल मध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . द्वितीय क्रमांक विद्याधाम प्रशाला व तृतीय क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल रयत शाळा यांचा आला .
स्पर्धेतील विजेत्या संघाना आमदार ॲड अशोक पवार यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली. तहसीलदार प्रशांत पिसाळ , मुख्याधिकारी ॲड प्रसाद बोरकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष नीलेश खाबिया , कार्याध्यक्षा प्रा क्रांती पैठणकर , पसायदान संस्थेचे अध्यक्ष व्ही .डी. कुलकर्णी जायंटस क्लब शिरुर चे अध्यक्ष प्रा .विलास आंबेकर , डेक्कन स्कूल शिरुरचे प्राचार्य डॉ .प्रा .समीर ओंकार ,रामलिंगचे माजी सरपंच विठ्ठल घावटे , शिरुर नगरपरिषदचे आधिकारी भूषण कडेकर, प्रवीण गायकवाड lआजिम सय्यद आदी यावेळी उपस्थित होते .
तहसीलदार प्रशांत पिसाळ व मुख्याधिकारी ॲड प्रसाद बोरकर यांनी हर घर तिरंगा मोहीमेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा सतीश धुमाळ यांनी केले. सर्व शाळानी दिलेल्या उस्फूर्त प्रतिसादा बद्दल आभार व्यक्त करुन पुढील वर्षी ही देशभक्तीपर समूहगायन स्पर्धेचे आयोजन करण्याचा मानस धुमाळ यांनी व्यक्त केला निकालाचे वाचन व्ही .डी .कुलकर्णी यांनी केले . स्वागत व आभार प्राचार्य डॉ समीर ओंकार यांनी मानले .
यास्पर्धेत परिसरातील १८ शाळांचे संघ सहभागी झाले होते . सहभागी सर्व विद्यार्थ्याना सहभाग प्रमाणपत्रे व संस्कारक्षम पुस्तके भेट देण्यात आली .
फोटो स्पर्धेतील विजेताना बक्षीस देताना आमदार ॲड अशोक पवार

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button