Uncategorized
शिरूर मध्ये दोन वर्षानंतर गणेश विसर्जन मिरवणुकीत वाद्याच्या तालावर तरुणाई ने आनंद लुटला
शिरुर ama9 वृत्तसेवा
दोन वर्षाच्या कोरोना काळा नंतर आलेल्या गणेश उत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत सर्व तरुणाई वाद्याच्या तालावर थिरकत बेभाण झाली दिसत होती .
ओंसडून वाहणारा उत्साह व अलोट भाविकांच्या उपस्थितीत शिरुरची गणेशाची विसर्जन शांततेत मिरवणूक पार पडली .
शिरुर शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूकीची सुरुवात मानाचा पहिला गणपती असणाऱ्या रामआळी तील श्रीराम मंदिरातील गणेशा पासून झाली . दुपारी एकच्या सुमारास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत व प्रसिध्द उद्योगपती प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते राम मंदिरातील गणेशाची आरती झाल्यावर मुख्य विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली .
सायंकाळी साडेसहा वाजता मानाचा पहिला श्रीराम मंदिरातील गणेशाचे विसर्जन झाले . शिरुर नगरपरिषद कामगार गणेश मंडळ , छत्रपती संभाजी महाराज गणेश मित्रमंड्ळ संभाजीनगर ( हुडको कॉलनी ), डंबेनाला गणेश मित्र मंडळ यशवंतराव चव्हाण चौक यांनी दुपारी तर सूरजनगर गणेश मित्र मंडळ , खारा मळा गणेश मित्र मंडळ येथील गणेशाचे सायंकाळी विसर्जन करण्यात आले .सकाळ पासून शहरातील लाटेआळीतील विसर्जन घाटावर भाविकांची गणेश विसर्जनासाठी गर्दी झाली होती. शिरुर नगरपरिषदने याठिकाणी निर्माल्य कलश निर्माल्याचे संकलन करण्यासाठी ठेवला होता . त्याच बरोबर नदीकिनारी बॅरीकेडस ही लावण्यात आले होते . त्याखेरीज मुर्ती संकलन केंद्र ही नदी किनारी होते .या ठिकाणीही मोठ्या प्रतिसाद भाविकांनी दिला . वात्सल्यसिंधु संस्था व शिरुर नगरपरिषद यांनी मुर्तीचे संकलन केले यावेळी शिरुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ॲड . प्रसाद बोरकर , स्वच्छता आधिकारी दत्तात्रेय बर्गे , वात्सल्य सिंधु संस्थेच्या सुनंदा लंघे , उषा वाखारे , प्रा . सतीश धुमाळआदी उपस्थित होते .
सायंकाळी विद्युत रोषणाई केलेले गणेश मंडळे मुख्य विसर्जन मिरवणूकीत सहभागी झाले .छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळ लाटेआळी यांच्या गणेशाची मुर्ती गजरथात आरुढ होती .रथावरील विठ्ठलांची भव्य मुर्ती ही लक्षवेधी होती . आखील रामआळी गणेश मित्र मंड्ळ यांनी विसर्जन मिरवणूक साठी मयूर रथ तयार केला होता . नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या हलवाई चौक गणेश मित्र मंड्ळाचा हलवाई चौकाचा राजा आकर्षक अश्या शिवशंकर रथात आरुढ होता .हलवाई गणेशासाठी बनविलेल्या तीन किलो चांदीचा वजनाचा मुकुट प्रसिध्द उद्योगपती प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते हलवाई गणेशाला अर्पण करण्यात आला . हनुमान गणेश मित्र मंड्ळ मारुती आळी यांच्या विसर्जन रथावर राधा कृष्णचा देखावा सादर करण्यात आला होता. .अंजिक्यतारा गणेश मित्र मंडळ यांच्या गणेशाची मुर्ती घोड्याच्या बग्गीत विराजमान होती .विठ्ठल मंदिर गणेश मंडळ कुंभार आळी यांची गणेश मुर्ती विद्युत रोषणाई केलेल्या रथात विराजमान होती . आझाद गणेश मित्र मंडळ लाटेआळी यांची गणेश मुर्ती आकर्षक फुलांची सजावट केलेल्या पुष्परथात विराजमान झाली होती .
पूर्वमुखी हनुमान गणेश मित्र मंडळ सोनार आळी यांची गणेशाची मुर्ती घोड्याच्या बग्गीत होती .आडत बाजार गणेश मित्र मंडळ यांची गणेशाची मुर्ती भव्य अश्या मयूररथात होती . श्री. गोपाल मोठी तालीम गणेश मंड्ळाने विसर्जन मिरवणुकीसाठी सादर केलेल्या देखावातील भगवान शंकराची मुर्ती लक्षवेधून घेणारी होती .युवा गोपाल तालीम गणेश मित्र मंड्ळ यांनी साईदरबारचा देखावा सादर केला. भव्य साईबाबांची मुर्ती देखावाचे आकर्षण ठरली .सिध्दार्थ प्रतिष्ठान शांतीनगर यांच्या भव्य गणेशमुर्ती भोवती ही आकर्षक देखावा सादर करण्यात आला होता .रामलिंग गणेश मित्र मंडळ करंजुले नगर यांनी आकर्षक अश्या पुष्पसजावटीतून त्रिशुल रथाचा देखावा सादर केला होता . जय बजरंग गणेश मित्र मंड्ळ जोशीवाडी यांनी बैलगाडी रथात गणेशाची मुर्ती विराजमान केली होती .त्रिमुर्ती गणेश मित्र मंडळ रेव्हन्यू कॉलनी यांनी विसर्जन मिरवणूकीसाठी फुलाच्या सजावटीचा देखावा सादर केला होता .
अमृतमहोत्सव वर्ष साजरा करत असणाऱ्या आझाद हिंद गणेश मित्र मंडळ सुभाष चौक यांनी आकर्षक अश्या लक्षवेधी रथ विसर्जनासाठी केला होता .
श्री साई गणेश मित्र मंड्ळ एकतानगर यांनी आकर्षक रथ विसर्जन साठी केला होता. आखिल गुजर मळा गणेश मित्र मंडळ यांनी ही आकर्षक देखावा सादर केला होता . सिंहगर्जना गणेश मंडळ ढोरआळी यांनी ही आकर्षक अशी सजावट विसर्जन मिरवणुकीसाठी केली होती .भाजी बाजारातील मुंजोबा गणेश मित्र मंड्ळाने शारदा गजाननच्या मुर्ती भोवती आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती . साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे गणेश मित्र मंडळ लाटेआळी या मंडळाची गणेशाची मुर्ती बैलगाडीत विराजमान होती . मुंजोबा गणेश मित्र मंड्ळ मुंजोबा मंदिर यांनी साई दरबारचा देखावा सादर केला होता
.प्रीतम प्रकाश नगर गणेश मित्र मंड्ळ यांनी आकर्षक अशी सजावट केली होती .सर्वात शेवटी आझाद हिंद गणेश मित्र मंडळ सुभाष चौक यांच्या गणेशाचा विसर्जनाने विसर्जन मिरवणूकीची सांगता झाली .
दरम्यान विसर्जन घाटावर सरंक्षणाच्या दृष्टीने नदी किनारी बॅरीगेड लावण्यात आली होती . त्याच बरोबर या परिसराची साफसफाई करुन हॅलोजनची व्यवस्था करण्यात आली . विसर्जन घाटावर जीवरक्षक तैनात होते .
विसर्जन मिरवणुकीत सहभागी गणेशमंडळाच्या स्वागतासाठी नगरपरिषदचा वतीने हलवाई चौकात स्वागत कक्ष उभारण्यात आला होता पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत व मुख्याधिकारी ॲड प्रसाद बोरकर,पालिकेचे आधिकारी अय्युब सय्यद यांनी याठिकाणी गणेश मंडळाचे स्वागत केले . विसर्जन मिरवणूकी करिता १०० हून आधीक पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर होते असे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी सांगितले.
दरम्यान लाटेआळीतील विसर्जन घाटावर विसर्जना साठी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप मनसेचा वतीने करण्यात आले . या वेळी महेबुब सय्यद ,अनिल बांडे , आदित्य मैड ,रवी लेंडे ,हुसेन शहा आदींनी नियोजन केले होते .
आम्ही शिरूरकर फौंडेशन च्या वतीने गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचारी यांना ते ज्या पॉईंटवर असलेल्या ठिकाणी जेवनाचे फुड पॅकेट वाटप करण्यात आले . मागील १३ वर्षांपासून आम्ही शिरूरकर फौंडेशन हा उपक्रम राबवित आहे. याही वर्षी काल जवळपास १०० पोलिस, होमगार्ड, व इतर बाहेरील बंदोबस्तावर असलेल्या पोलीसांना पोळी भाजी, मोदक लाडू व टीश्यूपेपर, पाण्याची बाटली
या वेळी देण्यात आली . या उपक्रमासाठी रविंद्र सानप ,राजेश कोकणे, संदिप चिकने, राजेंद्र पोटावळे, विकास नागरगोजे, फक्कड शेख मिस्त्री, अनुप सानप, यांनी सहकार्य व मदत केली.







