Uncategorized

शिरूर येथील विद्याधाम प्रशालेमध्ये गुरुजन कृतज्ञता सोहळा

शिरूर ama9 वृत्तसेवा
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुरुंचे स्थान महत्वाचे असते . काही त्यांचे स्थान आयुष्यभर विसरत नाही . आपण जे काही आहोत ते गुरुजनानमुळे आहोत या गोष्टी लक्षात घेत येथील विद्याधाम प्रशाला मधील विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा केलेला आदर हा लक्षात घेणारा आहे .

विद्याधाम प्रशालेतील शिरूर येथील 1990 इयत्ता दहावी व 1992 इयत्ता बारावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती असलेले प्रेम या आदर व्यक्त करण्यासाठी एका आगळ्या वेगळया अशा कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले .70 ते 89 वयोगटातील गुरुजनांचे बँड व तुतारीच्या गजरात स्वागत केले. फुलांच्या पायघड्यांवरून शिक्षक येताना प्रत्येकाने नमस्कार करून त्यांचे स्वागत केले . प्रथम सर्व गुरुजनांना आकर्षक फेटे बांधले व त्यांचे पंचारतीने औक्षण केले. या स्वागताने साऱ्या गुरुजनांचे डोळे पाणावले. या निमित्ताने सारे शिक्षक आणि विदयार्थी यांची बत्तीस वर्षांनंतर भेट झाली .सर्वच शिक्षकांनाही भारावून गेल्यासारखेच झाले होते ,तर सर्व विद्यार्थ्यांना आपल्या शाळेतील मित्र-मैत्रिणी बत्तीस वर्षा नंतर पुन्हा भेटल्याचा आनंद झाला होता .तर प्रशालेचे माजी मुख्याध्यापक तु .म .परदेशी सर, घ.वा. करंदीकर सर तसेच काही माजी शिक्षक यांचीही भाषणे झाली . दिवंगत गुरुजन वर्ग व काळाच्या पडद्याआड गेलेले काही सवंगडी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रतिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या व त्यांच्या चालू असलेल्या सामाजिक कार्याची सर्व विद्यार्थ्यांना माहिती करून दिली .
 या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अर्चना तिवाटणे, शितल वाघ ,नीता बोरा, सीमा रूणवाल ,विशाखा गायकवाड, निर्मला आढाव ,स्वाती धडीवाल ,योगिनी तांबोळी ,संतोष खाबिया, अविनाश ससाणे ,शकील खान, प्रशांत शिंदे ,मनोज दीक्षित ,सुनील इंदलकर, निलेश खाबिया, गोकुळ रुणवाल, महेश सारडा ,रवीन बोरा व लहू गायकवाड आदींनी यशस्वी प्रयत्न केले . एकत्रीकरणातून प्रत्येकाला जगण्याची नवीन ऊर्जा दिलेली आहे, आणि समाजासमोर एक वेगळा आदर्श घालून दिलेला आहे.
प्रास्ताविक व स्वागत शीतल वाघ हिने केले ,योगिनी तांबोळी हिने आभार व्यक्त केले तर सूत्रसंचालन संतोष खाबिया व रविन बोरा यांनी केले.
फोटो ओळी बत्तीस वर्षा नंतर आपल्या गुरुजनान समवेत विद्याधाम प्रशालेतील विद्यार्थी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button