शिरुर मध्ये मनसेचे आंदोलन
शिरूर ama9 वृत्तसेवा पुणे येथे पाकिस्तान झिंदाबाद या घोषणा देण्यात आलेल्या या घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शिरुर शहर मनसेच्या वत्तीने आंदोलन करण्यात आले .
काही समाजकंटकांकडुन “पाकिस्तान जिंदाबाद” अशा घोषणा देण्यात आल्या ,याच्या निषेधार्थ दिनांक २५ सप्टेंबर रोजी शिरुर शहर मनसेच्या वत्तीने आस्वाद हाॅटेलजवळ निषेध व्यक्त करण्यात आला, यावेळी मनसे शहराध्यक्ष अविनाश घोगरे,मनसे महीला आघाडीच्या डाॅ.वैशाली साखरे,महीला शहराध्यक्ष शारदा भुजबळ,प्रसन्ना भोसले,विलास वीर,शैलेश जाधव, तसेच भाजपाचे उमेश शेळके,अजिंक्य तारु,रविराज बैनाडे,राकेश परदेशी,अमर झेंडे,नितीन काळे,राहुल भोते,योगेश कदम,रोहन जासुद हे उपस्थित होते, यावेळी बोलताना शहराध्यक्ष अविनाश घोगरे म्हणाले की, पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर देशातून हाकलून दया यासाठी मनसे सातत्याने आंदोलने करीत आहे तसेच पुणे पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी हे आश्रयाला असतात हे सांगत असुन कारवाई होत नाही , अशा देशद्रोही समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल. पाकिस्तान झिंदाबाद च्या घोषणा देणाऱ्यानी पाकिस्तान मध्ये जावे . छत्रपती शिवाजी महाराजानच्या या स्वराज्या मध्ये असे कृत्य खपुन घेणार नसल्याचा इशारा भाजप युवा मोर्चाचे शहरअध्यक्ष उमेश शेळके यांनी या वेळी दिला . जीथे देशभक्ती आणि देशप्रेमाचा विषय उपस्थित राहतो अशा वेळी आपल्या देशातील सर्व जाती,धर्म,पंथ यांनी एकञ येऊन आपल्या देशाच्या विरोधात काम करणार्या संघटना मोडीत काढल्या पाहीजे. अशी भावना मनसेच्या महीला आघाडीच्या शारदा भुजबळ आणि डाॅ.वैशाली साखरे यांनी व्यक्त केली. फोटो पुणे येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मनसे ने आंदोलन केले .

